Saturday, June 3, 2023

Latest Posts

शिंदे फडणवीस सरकारवर संजय राऊत यांनी केला आरोप

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार बेकायदा असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत, अन्यथा ते अडचणीत येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार बेकायदा असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत, अन्यथा ते अडचणीत येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. कोर्टाच्या निकालाचं विश्लेषण करताना त्यांनी हे सरकार तीन महिन्यात जाणार असल्याचंही म्हटलं आहे.राऊत म्हणाले, “शिंदे-फडणवीसांनी काल पत्रकार परिषदेत सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं चुकीच्या पद्धतीनं विश्लेषण केलं आहे. सुप्रीम कोर्टानं यांच्या अंगावर एकही वस्त्र ठेवलेलं नाही. सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला आणि त्यांच्या सरकारला दिल्लीत पूर्ण नग्न केलं आणि निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडं पाठवलं””हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं सांगितलं आहे. त्यांनी नेमलेला व्हीपच बेकायदा होता, तिथं ते हारले आहेत. राज्यपालांची संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर ठरवला सुप्रीम कोर्टानं.

एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी झालेली निवड ही देखील बेकायदा आहे, हे फडणवीसांना कळायला पाहिजे, त्यांनी कायद्याची पुस्तकं वाचायला हवीत,” अशा शब्दांत त्यांनी राऊतांनी टोला लगावला आहे.फक्त १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल होती पण आम्ही कोर्टाचे आभार मानतो की, त्यांनी संपूर्ण सरकारच अपात्र, बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यानंतरही दिलासा म्हणणारे सुप्रीम कोर्टाचा अवमान करत आहेत, हे उसनं अवसान आणत आहे.जुन्या व्यवस्थेवरच निकाल द्यायचा आहे . राहुल नार्वेकर लंडनमधून मुलाखती देत आहेत, जो खटला त्यांच्यासमोर चालणार आहे. घटनात्मक पदावर बसलेले लोक अशा मुलाखती देत नाहीत. सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की तेव्हा जी परिस्थिती होती ती डोळ्यासमोर ठेऊन निकाल द्यायचा आहे. नवी व्यवस्था निर्माण करायची नाही. त्यामुळं कोणीही कितीही बदमाशी करण्याचा प्रयत्न केला तरी सुप्रीम कोर्टाची लक्ष्मण रेषा डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही. हे सरकार तीन महिन्यात जाणार, या सरकारचा मृत्यू अटळ आहे. असं देखील संजय रयत यांनी सांगितले.

हे सरकार बेकायदेशीर आहे त्यामुळे अधिकारी, प्रशासन आणि पोलीसांना संजय राऊत यांनी आवाहन केले आहे की बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका, तुम्ही अडचणीत यालं. तुमच्यावर खटले दाखल होतील. शिंदे-फडणवीस यांनी काहीही म्हणू द्या. आत्तापर्यंत या सरकारने घेतलेले निर्णय बेकायदा आहेत. १६ आमदारांना घरी जावचं लागेल त्यानंतर २४ आमदार घरी जातील, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss