राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आता राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्या करू लागले आहेत. अश्यातच शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्याबाबत मोठे वक्तव्य करत त्यांना ‘राजकारणातील महामेरू’, ‘भीष्म पितामह’ अश्या उपमा दिल्या आहेत.
संजय राऊत यांनी आज (बुधवार, ६ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर मोठे भाष्य करत ‘शरद पवार हे संसदीय राजकारणातील महामेरू आहेत, ते राजकारणातले भीष्म पितामह आहेत,’ असे वक्तव्य केले. हा महाराष्ट्र, देश वाचवायचा आहे त्यासाठी तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे, असे आवाहन संजय राऊतांनी शरद पवारांना यावेळी केले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यावेळी म्हणाले, “शरद पवार हे संसदीय राजकारणातील महामेरू आहेत, ते राजकारणातले भीष्म पितामह आहेत. शरद पवार यांनी विविध पदांवर काम केलं आहे देशाच्या राजकारणात एकही नेता त्यांच्या इतके काम केले नाही. मागच्या वेळी दिल्लीत असताना त्यांनी माझ्याकडे देखील हा विषय बोलून दाखवला होता. वय हा विषय नसून अनुभव हा विषय आहे. शरद पवार राजकारणात असणं हे आमच्यासाठी मार्गदर्शक आणि दीपस्तंभ आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला, देशाला राजकीय क्षेत्रात येणाऱ्यांना होतो. दिल्लीच्या राजकारण्यांनी जे राजकारण केलं आहे तरीही हा प्रमुख स्तंभ आज उभा आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी इतकेच सांगेन आपण जिथे आहात तिथे ठाम उभे रहा आणि आमच्या सारखी माणसं आहेत त्यांना पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. आम्ही लढायला तयार आहोत हा महाराष्ट्र, देश वाचवायचा आहे त्यासाठी तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर