Tuesday, June 6, 2023

Latest Posts

संजय राऊतांनी लगावला विरोधकांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-७ क्वाड गटासह काही प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी आज, शुक्रवारी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत तीन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान ४० हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-७ क्वाड गटासह काही प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी आज, शुक्रवारी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत तीन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान ४० हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय बैठकींसह शिखर परिषदांमध्ये दोन डझनहून अधिक जागतिक नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. पंतप्रधानांचा हा दौरा खूप महत्वाचा आहे कारण पापुआ न्यू गिनी हा हिंद प्रशांत महासागरात स्थित एक बेट आहे आणि त्याच्या स्थानामुळे हिंद पॅसिफिक महासागराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वाचा आहे.जपानमधील जी-७ परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जपानमधून रवाना झाले आहेत. सध्या नरेंद्र मोदी जपान सोडून हिंद पॅसिफिक महासागरातील छोटा देश पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत.पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले. जेम्स मारापे यांनी नरेंद्र मोदी यांच्या चक्क पाया पडतानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरण स्पर्श केले. त्याचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोदींना संपूर्ण जग आदर देत असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा चरण स्पर्श आहे की गुडघा स्पर्श? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आणि त्यावर असे देखील संजय राऊत म्हणाले की , तुम्ही फोटो नीट आणि निरखून पाहा. तुम्हाला दिसून येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या समोर आले तर त्यांना आम्हीही वाकून नमस्कार करू. ते आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, असंही राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर नरेंद्र मोदींच्या आणि पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पडलेल्या पाय पाडण्या विषयी माहिती दिली.

तसेच संजय राऊत यांनी या संबंधी थोद्या फार प्रमाणात माहिती देकील दिली. पापुआ न्यू गिनी या देशाची लोकसंख्या ६० लाख आहे. त्या देशात ८५० भाषा आहेत. तो संपूर्ण आदिवासी भाग आहे. हा मागास भाग आहे. ज्या पंतप्रधानांनी मोदींना चरण स्पर्श केला, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होते. भ्रष्टाचार करणारे ते अर्थमंत्री होते. फरारही होते. त्यांनी चरणस्पर्श केला आनंदाची गोष्ट आहे. अंधश्रद्धा, भूतप्रेत आणि जादूटोणा यामुळे तो देश प्रसिद्ध आहे. त्यांनी नमस्कार केला असेल आणि भाजपवाले डंका पिटत असेल तर त्यांना माझा नमस्कार आहे, अस म्हणत विरोधकांना सुनावले आहे. गुवाहीटीत गेलेल्यांनी तिकडे जायला हवं होतं, असा टोलाही संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

हे ही वाचा:

Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss