संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्याविषयी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. कराडला देण्यात येणाऱ्या सरकारे पाहुणचाराचा त्यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी आज २८ जानेवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले,”आजच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकुर यांनी सांगितले आहे की, या देशाचं सुप्रीम कोर्ट, असेल हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली आहे. ते म्हणत आहेत, आमचे न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली आहे आणि त्यानुसार निर्णय घेते. त्याचा संदर्भ घेत चंद्रचूड साहेबांनी तीन वर्ष मैदानावर खेळत राहिले बॉल घासत राहिले आणि विकेट घेतलीच नाही.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केला आहे, बीडमधल्या दहशतवाद विरोधात तांडव सुरू आहे आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखत आहे मला माहीत नाही, त्यांच्यासाठी स्पीकरमध्ये एक बंगला रिकामी केला आहे. हे अजित पवार यांना दिसत नाही का? हे सर्व धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, असे सुरेश धस सांगत आहेत. ते भाजपचे आमदार आहेत. अंजली दमानिया यांचाही भाजपचा संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल, पण कोणताच फैसला होणार नाही. काही दिवसात वाल्मीक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
सुरेश धस हे सरकार पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्याकडे पक्की माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाही. ते त्या भागातले आमदार आहेत, त्यांना तिकडची जास्त माहिती असेल आम्ही मुंबईत बसून बोलणं योग्य नाही, असा दावा खासदार संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
Mobile Forensic Van सुरू करणारे Maharashtra देशातील पहिले राज्य- CM Devendra Fadnavis