spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका …

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) वातावरण असं कधीच नव्हतं. इतकं अस्थिर, असुरक्षित जातीपातीमध्ये वाटलेलं सध्याचं वातावरण आहे. या सर्वांना जबाबदार भारतीय जनता पक्ष (BJP) आहे. ज्या दिवसापासून महाराष्ट्रात देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जातीपाती वाटला गेला. या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan), बाळासाहेब (Balasaheb) या नेत्यांनी महाराष्ट्र एकसंध ठेवला. ते त्यांचे कौशल्य होतं. पण गेल्या दहा वर्षांमध्ये हा महाराष्ट्र फाटला गेला आहे. जाती-धर्मानुसार महाराष्ट्राचे तुकडे पडत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

हेच देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅबीनेट मध्ये आम्ही धनगरांना आरक्षण देऊ असं सांगत होते. हेच फडणवीस आमच्या अडीच वर्षे सरकार असताना आमच्या हातात सत्ता आली तर मराठ्यांना २४ तासात आरक्षण देऊ असं सांगत होते. हे सांगणारे देवेंद्र फडणवीस मग आता आरक्षण का देत नाहीत? त्यामुळे जरांगे पाटील यांची भूमिका ती योग्य आहे, असं म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे पाच राज्याच्या निवडणुकीसाठी दिल्ली दौरा जात आहे. जाऊ द्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. पाच देशात देखील निवडणुका आहेत पक्षाने त्या ठिकाणी देखील पाठवलं. तर आम्हाला एक मराठी माणूस गेला. म्हणून आम्हाला आनंद आहे, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

माझ्या हातात सत्ता द्या २४ तासात मराठा आरक्षण देतो. ओबीसींना (OBC) आरक्षण देतो हे आपणच फुलबाजे उडवले होते. ते आता विझले आहेत. तुमचे फुलबाजे आश्वासनाचे विझले आहे का? सरकार त्यांच्यावरती दबाव का आणत आहे? तर संभाजीनगरमध्ये कॅबिनेट पहिली बैठक आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जात आहे. १६ तारखेला मी संभाजीनगरमध्ये आहे. त्या कॅबिनेट बैठकीमध्ये कोणते अडथळे येऊ नये म्हणून जरांगे पाटलांना गुंडाळण्याचा काम चालू आहे. मी आधीच सांगितलं आहे. तो तरुण नेता गुंडाळल्यां जाणाऱ्यापैकी नाहीत, असं संजट राऊत म्हणाले.

हे ही वाचा: 

Asia Cup 2023, पाकिस्तन आणि श्रीलंका यांचा सामना पावसामुळे रद्द झाला तर, इंडियासमोर फायनलला ‘ही’ टीम…

‘या’ दिवसांपासून ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत धावणार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss