spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी साधला निशाणा, लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे…

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना आणि कॅगचा अहवाल यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे

Samana Editorial On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Ladki Bahin Yojanan) गेमचेंज असून र ठरलेली अतिशय चर्चेत आहे. जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातीस महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. तसेच पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरन २१०० रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्याचा फायदा महायुतीलाही विधानसभेत झाला. तसेच आता लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्यात आला आहे. लवकरच हा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे काही निकष बदलण्यात आले आहेत. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त बोजा हा सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना आणि कॅगचा अहवाल यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे

सामना अग्रलेखात नेमकं काय?

“राज्यातील विद्यमान राज्यकर्त्यांचा बुरखा रोजच टराटरा फाटतो आहे. मग ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, राज्यातील कायदा-सुव्यवस्था असो, लाडकी बहीण योजना असो, की शेतकरी कर्जमाफी. प्रत्येक बाबतीत राज्य सरकार रोजच उघडे-नागडे होत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री ‘तपास सुरू आहे’, ‘कोणालाही सोडणार नाही’ हेच डमरू वाजवीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सर्व मंडळी राज्यातील तमाम ‘लाडक्या बहिणीं’चे ‘लाडके भाऊ’ वगैरे झाले होते. या योजनेवरून त्यांनी स्वतःच स्वतःला पंचारती ओवाळून घेतल्या होत्या.

“विधानसभा निवडणुकीपूर्वी उफाळून आलेले सत्ताधाऱ्यांचे ‘बंधूप्रेम’ सत्तेत बसताच असे आटत चालले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरूनही या मंडळींनी घूमजाव केले आहे. खुद्द राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ‘ताण’ पडत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफी विसरावी, असे जाहीर करून हात वर केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणी, आशा सेविकांपासून शेतकऱ्यांपर्यंत घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला होता. शेतकरी कर्जमाफी देणार म्हणजे देणारच, असा आव भाजपने जाहीरनाम्यात आणला होता. तुमचा तो आव आता कुठे गेला?” असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीत या मंडळींना जे यश मिळाले त्यात मोठा वाटा याच लाडक्या बहिणींचा आहे, असे ते मोठ्या तोंडाने सांगत होते. मात्र आता सत्तेत बसल्यावर यांच्या मोठ्या तोंडाचा चंबू झाला आहे आणि लाडक्या बहिणींना ‘निकषां’च्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग त्यांनी सुरू झाले केले आहेत. या चाळणीतून सुमारे 50 लाख ‘लाडक्या’ बहिणी ‘नावडत्या’ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच निकषांत न बसणाऱ्या बहि‍णींना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत सरकारजमा करण्याच्या ‘सावकारी’ला सुरुवातदेखील झाली आहे”, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…

Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss