Tuesday, June 6, 2023

Latest Posts

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलत असताना संजय राऊत यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहरी राजा आहेत.

आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलत असताना संजय राऊत यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहरी राजा आहेत. त्यामुळे नोटबंदीसारखे निर्णय घेत आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

तसेच ते पुढे म्हणाले भाजपच्या विरोधात निकाल गेला किंवा त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं ,तर त्याच्यावर पाणी टाकण्याचं काम असे उलट सुलट निर्णय घेऊन केले जातात. त्यातलाच हा २००० नोटा रद्द करण्याबाबतचा निर्णय आहे. या देशाला एक लहरी राजा मिळाला आहे. आणि तो लहरी राजा अशाच प्रकारचा निर्णय घेणार. २०२४ पर्यंतचा काळ आपण अशाच प्रकारे ढकला पाहिजे. तसेच कर्नाटकचा निकाल म्हणजे भाजपचा एक पराभव आहे. कर्नाटक प्रखर हिंदुत्ववादी राज्य आहे. अशा हिंदुत्ववादी राज्याने नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपचा मोठा पराभव केला. असे पराभव भविष्यात तुमच्या वाट्याला येणार आहेत. तसेच मुंबई ठाण्यासह १४ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तुम्ही हिंमत का दाखवत नाहीत ? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मोदी, अमित शहा कोणालाही प्रचाराला येऊ द्यात, इथे तंबू ठोकून बसा. कुठेही बसा पण निवडणुका घ्या. तेव्हा आम्ही दाखवू जनमत कोणाच्या बाजूने आहे.

तसेच पुढे संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील भाष्य केले. ता म्हणाले की, जयंत पाटील यांना ईडी च समन्स आलेला आहे आणि त्यात जाणार आहेत. राजकीय दबावाचे एक षडयंत्र आहे. जयंत पाटील हे स्वाभिमानी नेते आहेत. त्यांनी ताट मानेनं तपास यंत्रणांना सामोरे गेलं पाहिजे. २०२४ ला ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचे किती वेळ बसवायचे याच्या यादी आम्ही लवकरच तयार करू असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले, मी लोकसभा १९ जागा संदर्भात मागणी केली असे म्हणालो नाही. आमच्या १९ जागा लोकसभेमध्ये आहेत त्यातील काही लोक सोडून गेले आम्ही या जागा निवडून आलेलो आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे, तीन पक्षांमध्ये समन्वय साधून याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. जागांमध्ये अदलाबदल करावी लागेल , काही ठिकाणी तडजोड करावी लागेल. महाविकास आघाडीच्या मजबुती बद्दल शंका असण्याचे कारण नाही. १६ १६ १६ असा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही. अशी चर्चा कुठेही झालेली नाही. आम्ही एक बैठक घेऊन यावर सविस्तर चर्चा करू. तर पुढे संजय राऊत म्हणाले आहेत की, नव्या संसदेचे लोकार्पण हे राष्ट्रपतींकडून व्हावं अशी जर मागणी होत असेल तर शिवसेना त्या मागणीला पाठिंबा देईल.

तसेच नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्ह्णून आदित्य ठाकरे यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत या संदर्भात देखील संजय राऊत यांनी भाष्य केले आहे आणि ते म्हणले आहेत की, त्यात चुकीचं काय आहे? लोकांच्या जर भावना असतील, त्यांचं प्रेम तिथे बॅनर मधून दाखवत असतील तर त्यात चुकीचं वाटत नाही.

तसेच राऊत पुढे म्हणाले, पापुआ न्यू गिनी मध्ये प्रधानमंत्री यांना चरण स्पर्श केला की गुडघा स्पर्श ? प्रधानमंत्री आमच्या समोर राहिले तर ते वयाने मोठे आहेत. आम्ही सुद्धा वाकून नमस्कार करू. पापुआ न्यू गिनी ६० लाख लोकांचा एक देश आहे. त्यांचा जगाशी काही संबंध नाही. अशिक्षित असा भाग आहे. ज्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी आणि चरणस्पर्श केले, त्या पंतप्रधानांवर काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप होते. ते फरार झाले होते. त्यांनी चरण स्पर्श केला त्याचा आनंद आहे. अंधश्रद्धा जादूटोणा यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. गुवाहाटी ला जाणाऱ्या लोकांनी या देशात जायला हवं, त्यांच्यासाठी अत्यंत योग्य देश आहे अस देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी खुशखबर! ताडदेव, दादरसह अनेक ठिकाणी म्हाडाच्या घरांच्या सोडती

Jayant Patil ईडी कार्यालयाकडे रवाना, कार्यकर्त्यांना केले आवाहन…

Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss