spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Sanjay Raut on IANS Matrize Survey: चंद्रचूड आणि मोदी शहांच्या कृपेने… संजय राऊत यांची सर्वेवरून महायुतीवर सडकून टीका

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी बातमी समोर आली असून आयएएनएस मॅट्रीजचा सर्वे (IANS Matrize Survey) समोर आला आहे. आयएएनएस मॅट्रीजच्या सर्वेनुसार, राज्यात यंदा महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या असून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर मोठे भाष्य केले आहे.

आयएएनएस मॅट्रीजचा सर्वे समोर आला असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता सर्वेनुसार वर्तवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी आज (सोमवार, ११ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधत याविषयी मोठे भाष्य केले आहे. ‘महायुतीचे लोक सर्वे करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत,’ अशी टीका त्यांनी यावेळी केली.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यावेळी म्हणाले, “जे कोणाचे सर्वे येत आहेत त्याच्यावरती फार विश्वास ठेवावा अशी काही परिस्थिती नाही. लोकसभेला देखील असेच सर्वे आले होते. महाविकास आघाडीला १० जागादेखील मिळणार नाही असे सर्वेनुसार सांगितले होते. पण आम्ही ३१ जागा जिंकलो आणि हा लोकसभेचा सर्वे खोटा ठरवला. महायुतीचे लोक कुठूनतरी सर्वे करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत. मी आपल्याला सांगत आहे की आम्हाला १६० ते १६५ जागा मिळणार आहेत. भाजपचे लोक चोऱ्यामाऱ्या करून ज्या जागा जिंकतात, तिथे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सावध राहायला सांगितलं आहे. आता जे सरकार आहे चंद्रचूड यांच्या कृपेने किंवा मोदी शहांच्या कृपेने बसलेले आहे. ते पुन्हा निवडून येणार नाही आहे अशी खात्री आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

IANS Matrize Survey: मोठी बातमी! महानिवडणुकीचा सर्वे आला समोर… महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss