राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. राज्यभरात सर्वच पक्षांच्या सभा पार पडत आहेत. अश्यातच काल (शुक्रवार, ८ नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची विक्रोळीत सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली. मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेल असा इशारा मनसेप्रमुखांनी यावेळी दिला. आता संजय राऊत यांनी यावर प्रत्युत्तर दिले असून यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ‘भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय करू शकतो?’ असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ‘ते ठाकरे आहेत तर मी बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे,’ अस्से घणाघाती वक्तव्य त्यांनी केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यावेळी म्हणाले, “राज ठाकरे बोलत आहेत बोलू द्या, भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय करू शकतो? जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. जे महाराष्ट्राची लूट करत आहेत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे एक सुद्धा हत्यार आहे आणि ज्याला जी भाषा समजते त्या भाषेचा वापर करावा असा आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. भाषेचा शुद्ध, स्वच्छ, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी वापरायची महाराष्ट्रातला शत्रूसाठी आम्ही ही चाटुगिरी आणि चमचेगिरी करणारे लोकं नाही आहोत. राज ठाकरे इथे येऊन काय बोलले तेथे मला जायचे नाही. निवडणुका आहेत, भारतीय जनता पक्षाचा स्क्रिप्ट आहे, फडणवीस यांचे स्क्रिप्ट असेल ते बोलावं लागतं नाहीतर ईडीची तलवार आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली
ते पुढे म्हणाले, “आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत, आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेले आहे. माझं बरंच आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर गेलं आहे, हे राज ठाकरे यांनादेखील माहित आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं काय बोलायचं याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला राऊत आहे,” असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
संजय राऊतांवर टीका करत राज ठाकरे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिकार संपादक इकडे राहतो. वाटतं कि तोंड त्यांनाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना ‘तुम दो मारो, हम चार मारेंगे’ घाण करून टाकलं सगळं राजकारण… सकाळी उठायचं, यांना (प्रसारमाध्यमांना) धरायचं. संयम बाळगतोय याचा अर्थ गांXX समजू नये,” असे ते म्हणाले होते.
हे ही वाचा:
PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य