Friday, December 1, 2023

Latest Posts

संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…

देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकीवेळी मी पुन्हा येईन असा नारा दिला. त्यानंतर या त्यांच्या नाऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकीवेळी मी पुन्हा येईन असा नारा दिला. त्यानंतर या त्यांच्या नाऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा सुरु झाली आहे. काल दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हीडिओ शेअर करण्यात आला. त्यानंतर पुढच्या तासाभरात तो डिलीट करण्यात आला. हा व्हिडिओ डिलीट केल्यानंतर आता सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. अनेक विरोधकांनी यावर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. यावर संजय राऊत यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो. कारण ते कायदेशीर सरकार असेल आम्ही कायदा आणि घटना मानणारी लोक आहोत. जर ते कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या राज्यात बेकायदेशीर मुख्यमंत्री बसलेले आहेत. तेच बेकायदेशीर आदेश पोलीस आणि यंत्रणा पाळते आहे. हे अत्यंत चुकीच आहे. एक तात्पुरती व्यवस्था म्हणून कायदेशीर मुख्यमंत्री येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत नक्कीच करू. देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. सातत्याने गेल्या पाच वर्षापासून मी पुन्हा येईन, असं सांगत आहेत. पण त्यांना पुन्हा घ्यायची संधी मिळत नाही. फौजदाराचा हवालदार केला जातो आणि त्यांना आणलं जातं. एक बेकायदेशीर मुख्यमंत्री त्यांच्या छातीवर बसवलं जातं. शिंदे यांना जावं लागेल आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झाले. शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्व स्थान हे धुळीस मिळाले आहे. याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल. राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे. तो मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो.

तसेच अजित पवार एकनाथ शिंदे यांना यासाठीच पक्षातून फोडलेलं आहे. की त्यांच्या नेत्यांची बदनामी करावी. अजित पवार शरद पवारांच्या बदनामीच वक्तव्य थंड डोक्याने ऐकत होते. याचा अर्थ त्यांचा स्वाभिमान मेलेला आहे. जेव्हा पवारांना पद्मविभूषण दिला होता. तेव्हा या लोकांनी भांग प्यायली होती का? पवारांनी केलेल्या कामापैकी एक टक्का तरी काम त्यांनी करावं आणि मग पवारांवर टीका करावी. काही वर्षांपूर्वी हेच नरेंद्र मोदी बारामतीत येऊन शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत. त्यांचं बोट धरून मी राजकारणात कसा आलो? हे बोलत होते. ते मराठा समाजाच्या आंदोलनावर बोलले नाहीत, शेतकरी आत्महत्या वर बोललेले नाहीत, ते फक्त शरद पवार यांच्यावर बोलले. ज्या पवारांचा सन्मान या देशाने राज्याने केला. ही एक विकृती आहे आणि या विकृतीचा अंत २०२४ साली होईल असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

 ‘रंग माझा वेगळा’ फेम दीपा पोहोचली अनघा अतुलच्या हॉटेलमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss