spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Sanjay Raut: ईडीचा दबाव हे पक्ष फोडीमागचे मु्ख्य हत्यार… Chhagan Bhujbal यांच्या वक्तव्यावरून राऊतांचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अतिशय धक्कादायक विधान करत ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेल्याचे सांगितले आहे. यावरून राजकीय वातावरणात एकाच खळबळ उडाली असून यावरून चर्चांना उधाण आले आहे. आधीच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भुजबळांच्या विधानावरुन त्यात आणखी भर पडली आहे. अश्यातच शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून भाजपवर जोरदार टीका करत ‘ईडीचा दबाव हे पक्ष फोडीमागचे मु्ख्य हत्यार’ असल्याचे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यांनी आज (शुक्रवार, ८ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “भुजबळ काय म्हणत आहेत किंवा प्रफुल पाटील काय म्हणत आहे, प्रताप सरनाईक काय म्हणत आहेत, भावना गवळी काय म्हणत आहेत त्याला आता काही अर्थ नाही हे सगळे एकनाथ शिंदेसह अजित पवार यांच्यापासून सगळे ईडी पासून बचाव करण्यासाठी, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी पक्ष सोडून गेले आहेत. भाजपमध्ये जाताच प्रफुल पटेल यांची इस्टेट मोकळी झाली नसती, भाजपमध्ये जातात इतर अनेकांच्या प्रॉपर्टी मोकळ्या झाल्या नसत्या आणि सध्या तरी ई डी आणि सीबीआयच्या फायली बंद करून कपाटात ठेवल्या नसत्या.”

“हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील शिवसेनेतून फुटून गेलेले आमचे लोकं असतील या सर्वांचे पलायण हे ईडीला घाबरून झाले आहे. आता त्यांना भिती यासाठी वाटत नाही आहे कारण महाराष्ट्रात सरकार बदलत आहे आणि जे काही साध्य करून घ्यायचं होतं ते मागच्या दोन वर्षात त्यांनी करून घेतला आहे. हे जे बाजूला मुलुंडचे नागडे पोपटलाल आहेत ते सर्वांना तुरुंगात टाकायला निघाले होते आता त्यांचा आवाज बंद झाला का बंद झाला ? त्यांच्या घशात काय गेलं त्यांच्या घशाला बुच बसला याचा अर्थ ईडीची कारवाई थांबली का थांबवण्यात आली,” अश्या अशब्दांत त्यांनी भाजप नेते किरीट सोमयांवरदेखील निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, “छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले. त्यांचा पुतण्या तुरुंगात जाऊन आला. त्यांची प्रॉपर्टी अजूनही जप्त झालेली आहे. प्रत्येकाला एक मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून त्यांनी आपापल्या पक्षाच्या, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता तुम्ही लपवाछपवी कशाला करता आहात, मी नाही त्यातली कडी लाव आतली काही गरज नाही झाला आहे मान्य केला आहे पळून गेलात संपला विषय. माझ्यावर अशा प्रकारचा दबाव होता तेव्हाचे उपराष्ट्रपती त्यांना पत्र लिहून कळवला होते दिल्लीमध्ये काय झालं ते पत्र रेकॉर्डवर आहे अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता, अनिल परब यांच्यावर दबाब होता. रवींद्र वायकर हे कालपर्यंत आमच्या बरोबर होते दुसऱ्या दिवशी निघून गेले फाईल बंद झाली बीएमसी मधील गुन्हे घेण्यात आले, इतर गुन्हे मागे घेण्यात आले. ईडीचा दबाव हे पक्ष फोडीमागचे मु्ख्य हत्यार होते. दबाव अशा प्रकारचा असतो की प्रमुख काम करणारे नेते असतात त्यांनी आपला पक्ष सोडायचा आणि भाजपच्या तंबूत जायचे. आमच्यासारखे जे लोकं आहेत ज्यांचे आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेलं, आम्ही तोंडावर सांगितले आहे की मरण पत्करू पण शरण जाणार नाही. पण काही कमजोर हृदयाची माणसं असतात आणि काळीज उंदराचं तर ते डरकाळी फोडत असतात पण त्यांच्या काळीज हे उंदराचं होतं हे आम्ही नंतर पाहिलं,” असे ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss