spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

तुमचे पूर्वज मोघलांचे चाकर, तुमच्या मनात छ. शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का? Sanjay Raut यांचा Devendra Fadnavis यांना खोचक सवाल

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आता राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्या करू लागले आहेत. अश्यातच, शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा केली. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ‘पहिल्यांदा मुंब्र्यात मंदिर उभारा,’ असे वक्तव्य केले होते. यावरून संजय राऊत यांनी आज (बुधवार, ६ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, “गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे एक विषय मांडत आहेत. त्यामुळे फडणवीस व शिंदे यांच्या पोटात कालवाकालव सुरु झालीय. या राजवटीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, महाराजांचा पुतळा कोसळून पडला आहे. फडणवीसांनी दिल्लीच्या चरणी तो स्वाभिमान गहाण ठेवला आहे. महाराजांपासून प्रेरणा मिळावी यासाठी प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर उभी करावीत अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. फडणवीस यांनी या संकल्पनेची चेष्टा केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे,” असे ते म्हणाले.

फडणवीसांचे पूर्वज मोघलांची चाकरी करत होते

ते पुढे म्हणाले, ‘शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चेष्टा केली आहे. मुंब्र्यात काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही पाकिस्तानात उभारू. या देशातील मुसलमानांना तुम्ही बदनाम करत आहात. बटेंगे तो कटिंग चालत नाही, त्यामुळे अशाप्रकारे तुम्ही अपमान करत आहात. तुमचे पूर्वज मोघलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राशी गद्दारी करत होते ही फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका. आम्ही मंदिर उभा करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला त्याचा त्रास होतोय. तुम्ही मुलींची चेष्टा करता, तुम्ही शिवसेनेची चेष्टा करता, तुमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का? कारण तुमचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर नसून गुजरातवर आहे. शिवरायांनी जी सुरत लुटली त्या सुरत वर तुमचं प्रेम आहे,” असे ते म्हणाले.

फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा द्वेष्टा

“अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक उभा करणार होतात त्याच काय झालं? जिथे सांगाल तिथे आम्ही मंदिर बांधून देतो तुमची हिंमत आहे का मंदिरात येण्याची? फडणवीस अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा द्वेष्टा आहे हे स्पष्ट झालं आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”

अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss