spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

राज्यकर्ते गुजरातची लाचारी करत आहेत, हा विचार बाळासाहेब ठाकरे यांचा नव्हता: Sanjay Raut

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच आज (रविवार, १७ नोव्हेंबर) शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुतीवर (Mahayuti) पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्रकार परिषदेत संवाद साधत ते म्हणाले, “आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. हि निवडणूक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने नावाने लढत आहोत. कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली महाराष्ट्राचं रक्षण, मुंबईचं रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान हे सगळं गेल्या अडीच वर्षात संकटात आहे. महाराष्ट्रावर गुजरातने ज्याप्रकारे आक्रमक केलं आणि आमचे राज्यकर्ते सध्याचे किंवा त्यांच्या कुटुंबातील काही लोक गुजरातची लाचारी करत आहेत. गुजरातच्या नवनिर्माण लागले. हा विचार बाळासाहेब ठाकरे यांचा नव्हता किंवा नाही बाळासाहेबांनी आम्हाला ताठ पाठीचा कणा दिला. बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवला. एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण स्वतःला विकू नको. या सगळ्याची आज आम्हाला आठवण येते आणि यावेळची निवडणूक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या भूमिका, त्यांचे विचार, त्यांच्या महाराष्ट्रावर मराठी माणसावर असलेले ऋण हे केंद्रस्थानी ठेवून लढले जात आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही सगळे काल प्रियंका गांधी शिवसेनाप्रमुख यांचा संदर्भ दिला. शरद पवार आणि आम्ही सगळे बाळासाहेबांच्या विचारांची मशाल घेऊन पुढे निघाले आहोत. आजचा दिवस हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरण करण्याचा दिवस, आम्ही रोजच स्मरण करतो. आज विशेष महत्त्व आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss