spot_img
spot_img

Latest Posts

मोदी सरकारवर संजय राऊत यांचा घणाघात

इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी महिन्याभरापासून सुरु आहे. बैठकीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या बैठकीत जातीने लक्ष देत आहेत.

इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी महिन्याभरापासून सुरु आहे. बैठकीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या बैठकीत जातीने लक्ष देत आहेत. त्यांच्यावरही अनेक जबाबदाऱ्या आहेत. आम्ही एकत्र काम करत आहोत. आज संध्याकाळी ४ वाजता ग्रँड हयात येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलीये, अशी माहिती त्यांनी दिली. त्या संदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

केंद्र सरकारचा मुंबईवर डोळा आहे. केंद्राला मुंबई गिळंकृत करायची आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुंबईची सूत्रे हाती घेतली आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेने हे होऊ दिलं नसतं, त्यामुळेच शिवसेना फोडण्यात आली. एक बुळचट आणि सत्तेसाठी लाचार मुख्यमंत्री खुर्चीवर बसवला गेला, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर ही मुंबई मिळाली आहे. या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून थोडाही स्वाभिमान असेल तर त्यांनी राजीमाना द्यावा आणि केंद्र सरकारला जाब विचारावा. मुंबई महाराष्ट्राची राहावी, मुंबई मराठी माणसांची राहावी यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. पण, आता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मराठी माणसाच्या स्वाभीमानावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, अशी टीका राऊतांनी केली.

आताच सत्तेत सामील झाले असले तरी त्यांना मराठी माणसाबद्दल काही वाटत नाही का? मिंथे सरकार, बुळसट सरकार उघड्या डोळ्यांची महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान पाहात आहे. मात्र त्यावर काहीच बोलत नाही असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच मुंबईसाठी केले होती. एकनाथ शिंदे लाचार, बुळचट आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. इतिहासात त्यांची अशीच नोंद होईल. त्याचबरोबर त्यांनी मुंबईचा घास महाराष्ट्र द्रोही मोदी सरकारला गिळू दिला, असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला आहे. मोदी सरकार्ने रक्षाबंधनाचा निमित्त साधून महिलांना दिलासा देणारी घोषणा केली. मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतलाय. यावरुनही संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. आधी जनतेची लूट करायची आणि नंतर २०० रुपयांची सूट द्यायची. याचा अर्थ निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे दोनशे रुपयांची भीक जनतेच्या तोंडावर फेकण्यात आली आहे. ही लूट थांबवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.

हे ही वाचा:

स्पर्धा परीक्षा संदर्भात रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सत्तेत सामील होण्याआधी शरद पवारांनी काय दिला होता सल्ला ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss