spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर… Sanjay Raut यांचे मोठे वक्तव्य

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महाविकास आघाडीच्या अनेक बलाढ्य नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे (MNS) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) तर राज्यात भोपळाही फोडता आला नाही. यावरून आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) मोठे भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी आज (रविवार, २४ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तरीदेखील महाराष्ट्राला एक चित्र आशादायक दिसलं असतं. अनेक ठिकाणी भाजपने त्यांना त्यांचे उमेदवार उभे करायला लावले. त्याचा जो वारसा तो परिणाम अनेक वर्ष होतोय त्याप्रमाणे याही वर्षी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगणारे बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील अनेक ठिकाणी उमेदवार देऊन भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली. या सगळ्याचा भविष्यात आपल्याला विचार करावा लागेल, आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्रात काही योगदान द्यायचे असेल तर या महाराष्ट्रातील गुजराती लॉबी विरोधात आम्हाला सगळ्यांना एकत्र यावे लागेल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मराठी माणसात फूट पाडण्याचं काम यापुढे कोणी करू नये. मराठी माणूस त्यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग ही मराठी आहे, राष्ट्रवादी शरद पवारांना मानणारा वर्ग ही मराठी आहे. मनसेला मानणाराही मराठी वर्ग आहे. महाराष्ट्रात कोणतीही दुसरी व्यक्ती येऊन मतदान करणार नाही. आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र वाचवण्यासाठी गांभीर्याने पावले टाकावी लागतील. कालच्या निकालाला मी निकाल मानत नाही. जनतेचा कौल मानत नाही. त्यांनी जो कौल म्हणून आमच्यासमोर आणला आहे आम्हाला सगळ्यांना प्रत्येक राजकीय पक्षाला ज्याचा खरोखर महाराष्ट्रावर प्रेम आहे. मराठी माणसाविषयी जास्त आहे अशा सर्वांना गांभीर्याने विचार करू. १०६ हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला जो पाठीचा कणा दिला आहे. त्या कणावर लाथ मारून तो कणा तोडण्याचा जो प्रयत्न होतोय, त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रित बसून विचार करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss