Saturday, June 3, 2023

Latest Posts

संजय राऊतांची भाजपवर जोरदार टीका

आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी भाजपने आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. असे सांगण्यात येत आहे की या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे.

आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी भाजपने आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. असे सांगण्यात येत आहे की या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकांची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुंबई महानगरपालिका निवडणुका घ्यायला का फाटते? हिम्मत असे तर निवडणूक घ्या. पळ कशाला काढताय? न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवत आहात? किरेन रिजिजू यांना मंत्रिपदावरून का जावे लागले ते सांगा. नाही तर मी सांगेल त्याचे कारण भविष्यामध्ये सांगेल आणि या विषयाचा खुलासा करेल. न्यायालयाचा आणि कायद्याचा गैरवापर सुरु आहे. न्यायालयाचा वापर केला जात आहे. अशा प्रकरणावर बोला, खुलासा करा असे खुले आव्हान संजय राऊतांनी भाजपला दिले आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले की, १५० जागा जिंकणार आहात तर मग या मैदानात पळ कशाला काढत आहात? कर्नाटकमध्ये २०० जागा जिंकणार होतात. अशी भाषाही तुम्ही केली होती. कर्नाटक जिंकण्यासाठी सर्व फौज उतरवली त्याचबरोबर पूर्ण मंत्रिमंडळ उतरवले. फक्त राष्ट्रपतींना मैदानात उतरवण्याचे बाकी होत. काय झालं कर्नाटक निवडणुकीमध्ये? ते १५० ची भाषा करता त्यांना ६० मध्ये ऑलआऊट करू असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss