spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

कांदे-भुजबळ प्रकरणात Sanjay Raut यांनी Devendra Fadnavis यांवर साधला निशाणा

सुहास कांदे यांनी आक्रमक पवित्रा घेत समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आज तुझा मर्डर फिक्स आहे,असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काल दि. २० नोव्हेंबरला मतदान पार पडले. तर नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ, ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात तिरंगी लढत होती. मतदानाच्या दिवशी बुधवारी नांदगावमधील वातावरण तणावग्रस्त पाहायला मिळालं. मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळ यांनी अडवली. मतदार बाहेरून आणल्याचे सांगत समीर भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. गाडी पुढे जाऊ देणार नाही असे सांगत समीर भुजबळांनी कार्यकर्त्यांना अडवलं. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात हातापायी झाल्याचेही दिसून आले.

सुहास कांदे यांनी आक्रमक पवित्रा घेत समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर काही काळ दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील अरे, तुझ्यासारखे 56 पाहिले, असे म्हणत सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात तणावाचं वातावरण तयार झाले होते. सुहास कांदे यांनी मतदानासाठी बाहेरून मतदार आणले आहेत असा आरोप करत समीर भुजबळ यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी कांदे आणि भुजबळ यांची समजूत काढली त्यामुळे काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली.

या प्रकाराबद्दल शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “त्यांनी जर भुजबळ यांना धमकी दिली असेल ‘तुमचा मर्डर होईल’ मी हे टीव्ही पाहिलं तर निवडणूक आयोग विद्यमान गृहमंत्री फडणवीस यांची काही जबाबदारी आहे की नाही, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना जबाबदारी आहे की नाही. एक आमदार दुसऱ्या उमेदवाराला आज सकाळपर्यंत मर्डर होईल फिक्स आहे तुझा मर्डर आणि आम्हाला बोलता तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता तुमचे लोक काय भाषा वापरतात मर्डरची भाषा वापरतात. देवेंद्र फडणवीससारखे लोक आहेत गृहमंत्री पदावर, उपमुख्यमंत्री पदावरती, अमित शहा गृहमंत्र्याच्या राज्यात काय चाललं आहे राज्यामध्ये?”.

हे ही वाचा:

तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; Mahayuti की Mahavikas Aghadi नेमका कोणत्या ‘M’ ला मिळणार वाढत्या मतदानाचा फायदा ?

संगीतातील तीन उस्तादांच “वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss