spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षाला संजय राऊतांनी लिहिले खुले पत्र; पत्रात नेमकं काय?

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सुरु आहे. असे घडलो आम्ही’ हा कार्यक्रम मराठी साहित्य संमेलनामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत झाली. मुलाखतीत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता यावर खासदार संजय राऊत यांनी सवाल विचारला आहे.

 

नेमकं काय म्हणाले संजय राऊत

काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तर आरोप करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी संमेलनात सहभागी होण्यासाठी सदस्यांना 50 लाख तर आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा बाहेर सुरू असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. संजय राऊत यांनी आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली. संजय राऊतांनी संमेलनाचे संयोजक संजय नहार यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. त्यावर राजकारणासाठी साहित्य संमेलन मंचाचा वापर टाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया संमेलनाचे संयोजक संजय नहार यांनी दिली आहे.

संजय राऊतांच्या पत्रात काय ?
दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.” हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.

Latest Posts

Don't Miss