रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पाल्कमंत्रीपदावरून महायुतीत एकमत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नाशिक आणि रायगडमधील पालमंत्र्यांच्यापदाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासानंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “आश्चर्य आहे, आधी मंत्रिमंडळाचा शपथविधी होत नव्हता, मुख्यमंत्री कोण हे ठरत नव्हतं नंतर दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर बऱ्याच काळाने मंत्रिमंडळ स्थापन झालं. त्यानंतर खाते वाटपाला विलंब झाला, आता खातेवाटप होऊन कालखंड लोटला तरी जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नव्हते. मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी पालकमंत्री घोषित केले तर त्यांच्यामध्ये धूसफूस सुरु आहे, एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रास्तारोको केला. त्या बहुमताचा तुम्ही अनादर करता आहात. भाजपकडे पुरेसं बहुमत आहे इतर दोन मित्र पक्षांची ताकद चांगली आहे. आपापसात फक्त खून आणि मारामाऱ्या व्हायच्या बाकी आहेत फक्त आता एकमेकांवर हात उचलायचे बाकी आहे. ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना राग आला की ते गावी जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं? महाराष्ट्रात तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यावर चालणार आहे का ? लोकांचे अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत, तुमच्या हातात सत्ता आहे त्याचा राज्याच्या हितासाठी वापर करा. विजयाच्या धक्क्यातून सरकार सावरलेले नाही.”
पुढे संजय राऊत म्हणाले, “काँग्रेसवाले उद्धव ठाकरे संपले आहेत अशी भाषा करतात. शिवसेना संपली नाही आणि संपणार नाही. भाजपा-मोदी-शाह कोणालाही सोडत नाही, जे सख्खे आहेत त्यांना देखील सोडत नाहीत, सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरु असते. उदय सामंत यांचे नाव घ्यावे ते त्यांना दावोसला घेऊन गेले आहेत. उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार आहेत अशी माझी माहिती आहेत, जेव्हा सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले. भाजपा सर्व गट फोडतील, फोडाफोडी हेच त्यांचे राजकारण आहे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.”
हे ही वाचा :
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती