भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. त्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सुरेश धस यांच्यावर हल्लबोलही केला आहे. दरम्यान उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत पलटवार केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “धस हे कधीही पलटी मारतील, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आहे. धस यांनी ही कृती केली असेल तर देव त्यांना क्षमा करणारा नाही. ते पाप आहे. विश्वासघात यापेक्षा पुढले पाऊल आहे. बीडमधील काही नेत्यांनी मला धस यांच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. मला अजूनही अपेक्षा आहे धस असे काही करणार नाहीत.”
एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही
“एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुका उबाठा गटाचे पानिपत करा असे आवाहन केले आहे यावर बोलताना करू द्या त्यांना आवाहन. एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहा यांच्या मालकीचा आहे. ते सांगतील ते एकनाथ शिंदे बोलणार. त्यांना सध्या पक्ष चालवायला दिला आहे.”
माणिकराव कोकाटे वक्तव्य
“भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो यावर बोलताना या सर्वांनी मतदारांना सुद्धा भिकारी समजून घरा घरात पैसे वाटून मतदान घेतले”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी विरोधकांवर दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांचे सरकारचा लपविण्याचा प्रयत्न
कुंभमेळ्यात सर्वांनी जायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस गेले त्यात चुकीचे काही नाही. पण किती लोक मेले हे सांगण्यासाठी ते अजून ही तयार नाहीत. २ हजाराहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. आमचा आरोप आहे ते मेले आहेत. सरकार हे लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेत मी प्रश्न विचारला तर माझा माईक बंद केला गेला.
हे ही वाचा:
‘बीडमधील अठरा पगडजातीच्या लोकांचा विश्वास धस यांनी मातीमोल ठरवला’ Sushma Andhare यांचा खोचक टोला
गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, टिजर रिलीज