spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांच्या नाशिक दौरा ठाकरेंना महागात? अख्खी नगरपंचायत शिंदे गटात

एकीकडे पक्ष बांधणीसाठी नेते प्रयत्न करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी दौरे सुरू केले आहेत. तर दुसरीकडे काल दिनांक ४ जून रोजी मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या दोन शिलेदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

शिवसेनेत मोठा बंड हा झाला. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही संपूर्ण राज्यात दिसून येत आहेत. अनेक जिल्यामध्ये ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षामध्ये जाताना दिसून येत आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्हयात तर ठाकरे गटाला गळतीच लागली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग ही सुरु आहे.

एकीकडे पक्ष बांधणीसाठी नेते प्रयत्न करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी दौरे सुरू केले आहेत. तर दुसरीकडे काल दिनांक ४ जून रोजी मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या दोन शिलेदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. अशातच पक्ष बांधणीसाठी नेते प्रयत्न करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी दौरे सुरू केले आहेत. काल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी नाशिकमध्येच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे.

नाशिकमधील सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं नगरसेवकांनी म्हटलं आहे.

शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेवकांची यादी –

भारत वाघमारे- नगराध्यक्ष
सचिन आहेर- नगरसेवक (गटनेता)
भगवान आहेर- नगरसेवक
पुष्पाताई वाघमारे – नगरसेविका
अरुणाताई वाघमारे – नगरसेविका
प्रमिलाताई वाघमारे – नगरसेविका
दिनेश वाघ – कार्यकर्ते
विलास गोसावी – कार्यकर्ते
चारोस्कर – कार्यकर्ते
गौरव सोनवणे – कार्यकर्ते

हे ही वाचा:

Covid 19, चीनमध्ये वाढतोय कोरोनाचा उद्रेक, भारतातील स्थिती घ्या जाणून

पत्रकार दिनानिमित्त जाणून घ्या कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी महाराष्ट्राला दिले पहिले वृत्तपत्र?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss