spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांची खोचक टीका, धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं…

आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी अनेक गोष्टींवर त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे.

आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी अनेक गोष्टींवर त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे काल प्रतिक्रिया देताना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव घेताच थुंकले. मीडियात हा क्षण कैद झाला. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे, असा टोला संजय राऊत यांना लगावला. अजितदादांचा हा सल्ला संजय राऊत यांना पचनी पडलेला नाही. राऊत यांनी त्यावरून थेट अजितदादांवर खोचक टीका केली आहे. धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. ज्याचे जळतं त्याला कळत. माझ्या पक्षाशी मी प्रामाणिक आहे. आमचा भाजप बरोबर सुत जुळवण्याचा प्रयत्न नाहीये अशी खोचक टीका संजय राऊतांनी अजित पवारांवर केली आहे.

आंदोलन कसे करता बघायचे आहे. त्यांना काम धंदा नाही. लोकांनी त्यांना वर्षभर जोडे मारले आहेत. तसेच लोक निवडणूकीचं वाट पाहत आहेत. त्यांचा टाइमपास चालला आहे. ही भावना शून्य लोकं आहेत. त्यांनी स्वतःच जोड मारून घेतले पाहिजे. त्यांनी ठाकरे यांच्याशी बेईमानी केली. बिनडोक लोक आहेत. त्यांना प्रसिद्धी द्या आणि लोकांना कळू द्या. खऱ्या शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. शिवशाहीशी गद्दारी केली आणि ते शिवशाहीचा जयजयकार करतात. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पिसाळ आणि खोपडे सारखी ही लोकं आहेत असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, थुंकल्याबद्दल आपण माफी मागणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या देशातील १३० कोटी लोकांना माफी मागावी लागेल. रोज ते कुठे ना कुठे थुंकत असतात. मी राजकीय लोकांचे नाव घेतल्यावर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी बेईमानी केली. त्यांचं नाव ऐकल्यावर माझी जीभ चावली गेली. त्यातून थुंकलं गेलं. यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र काही कळतं का? मानसशास्त्रं कळतं का? माझ्या इतकं चांगलं संतुलन कुणाचंच नाही. माझ्यामुळे इतरांचं संतुलन बिघडलं आहे. हे त्यांनी मान्य करावं, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत यांनी ओडिशामधील रात्री झालेल्या अपघातांवर देखील भाष्य केले आहे. रेल्वे मंत्र्याने राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्णपणे बेफिकीरी आहे. मंत्री स्वतः ओडीसाचे आहेत यापूर्वी असे राजीनामे दिलेत तर त्यांनी पण द्यावा. तसेच पुढे त्यांनी काँग्रेस पक्षावर देखील भाष्य केले आहे. प्रत्येकाला वाटतं ४८ जागा निवडून येतील. पण तसे होत नाही काँग्रेसला एकच जागा मिळाली. आम्हाला लोकं सोडून गेले आहेत. नाशिकचा गद्दार निघून गेला पण शिवसेना ही जागा जिंकेल असं ते म्हणाले आहेत. माझ्या इतकं चांगलं संतुलन कुणाचे नाही. त्यांचे संतुलन बिघडलं आहे. मला सुरक्षेची गरज नाही. ज्यांनी बेईमानी केली त्यांना सुरक्षा द्या. सुरक्षा परत पाठवा. मी वन मॅन आर्मी आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss