मुंबईच्या मलबार हिल परिसरातील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारून अनेकदिवस झाले तरी सागर बंगला सोडून वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत. असे संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
पत्रकारांनी वर्षा बंगल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, मी वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) राहायला गेलो तरी रात्री तिकडे झोपणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही Devendra Fadanvis , सागर बंगल्यावरच राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानावर Sanjay Raut यांनी स्फोटक दावा केला आहे.
मुख्यमंत्रीपदाचं अधिकृत निवासस्थान राज्याच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा विषय आहे. भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली आहे. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रिपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, पण ते अधिकृत निवासस्थानी जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस अस्वस्थ का आहेत, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याला महात्मा फुले यांच्यापासून ते संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांची परंपरा आहे. या सगळ्यांनी राज्यातून अंगारे-धुपारे आणि अंधश्रद्धा हद्दपार केली, असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
हे ही वाचा :
कुलीकडून महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दीड तासात पकडले आरोपीला