spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

मुंबईची भाषा मराठी नाही हे छातीठोकपणे सांगणं हा भाजपचा पुढच्या रणनीतीचा भाग आहे Sanjay Raut यांचं वक्तव्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत अजय आशर याना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंना राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात असून आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अजय आशरवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत अजय आशर याना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंना राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात असून आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अजय आशरवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, “प्रवीण परदेशी यांची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर याचं आम्ही स्वागत करतो. अजय आशर हा एक बिल्डर होता, ठाण्यातला त्याचे उद्योग सर्वांना माहीत आहेत आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांच्या पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजय आशर याने पैशांची देवाणघेवाण केली. हजारो कोटींची संपत्ती त्यांनी बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीत त्यांनी देशातून पलायन केलं आहे. राणा नावाच्या अतिरेक्याला परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आर्थिक गुन्हेगार आहेत यांना कधी परत आणणार. अजय आशर याला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे, माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे पैसा गोळा केला याची माहिती घेतली पाहिजे. दहा हजार कोटी घेऊन तो परदेशात स्थायिक झाला आहे. अजय आशर आणि त्याचे राजकीय आका ही ईडीची फिट केस आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे,” असे राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले,” मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवरचा मराठी ठसा पुसून टाकायचा आहे हे काही लपवून राहिलेलं नाही. मुंबईचे महत्व कमी करायचं आहे. मराठी माणसाची विभागणी करायची आहे या सर्व गोष्टी करून झालेल्या आहे. मंगल प्रभात लोढा गुंड्यांचे बिल्डर हे भाजपचेच आहेत अशी अनेक नावं आहेत. हे भाजपचे अर्थ पुरवठादार आहेत. मुंबईची भाषा मराठी नाही हे छातीठोकपणे सांगणं हा पुढच्या रणनीतीचा भाग आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन हिंदी बोलू शकता का ? भैय्याजी जोशी यांनी माफी मागायला हवी, विधानसभेत या संदर्भातील ठराव मंजूर करून घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी थातूरमातूर उत्तर दिली, भैयाजी जोशी यांचा निषेध केला नाही.”

हे ही वाचा:

सुरेश धसांचा जवळीक खोक्या भाईची आणखी एक थरारक कहाणी सामर

….म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत! – CM Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss