विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. तसेच २० नोव्हेंबर म्हणजेच उद्या मुंबईमध्ये मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. प्रत्येक जण निवडणुकीच्या काळात आपापल्या परीने नागरिकांची मन जिकूंन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्यात प्रचारसभेदरम्यान कालीचरण महाराज म्हणाले की, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना जातीच्या आरक्षणाशी काहीही देणंघेणं नाही. मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला एक राक्षस आहे, अशी घणाघात टीका कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये या पार्श्ववभूमीवर रविवारी कालीचरण महाराज यांनी शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.
या प्रचारादरम्यान कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणाबाबत मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. मनोज जरांगे यांच्या भेटीला त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमदेवार संजय शिरसाट हे गेले. मनोज जरांगे यांना कालीचरण महाराज ‘रक्षक’ म्हटल्याने मराठा समाजांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यादरम्यान, या गोष्टीचा फटका उद्या होणाऱ्या मतदानावर देखील होऊ शकतो. या कारणामुळे संभाव्य धोका हा काळजीपूर्वक लक्षात घेता मनोज जरांगे आणि संजय शिरसाट यांच्या भेटीला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे.
मनोज जरांगेला (Manoj Jarange Patil) मराठी आरक्षणाशी काहीही देणंघेणं नाही अशी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच कालीचरण महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे की जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे. मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता. कालीचरण महाराज यांनी या पार्श्वभूमीवर रविवारी १७ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारादरम्यान मनोज जरांगेवर कालीचरण महाराजांनी भाष्य करत जोरदार टीका केली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कालीचरण म्हणाले की, आता एक आंदोलन हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी झालं.
त्या आंदोलनाची कशी हवा होती, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला ‘राक्षक आहे राक्षक’. मतदानाला हिंदू लोक जात नाहीत तर मग राजा कोण येणार? जर हिंदू मतदान करतील तर कट्टर हिंदू राजा होईल. पण जर तुम्ही पेट्रोल, दरवाढ, भाववाढीसाठी मतदान कराल मग राजा कोण बनणार? असा प्रश्न कालीचरण महाराजांनी विचारला.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…