Friday, April 19, 2024

Latest Posts

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. रोज स्किल उठल्यावर नवीन गोष्ट राजकरणातून ऐकायलाच येते. याच परिस्थितीत अचानक एक धक्कायदायक घटना समोर आली. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. सर्वच अपसारमाध्यमांमध्ये एकच बातमी आणि एकच शंका उपस्थित केली जात होती की, खरंच अजितपवर भाजपसोबत जाणार आहे

सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. रोज स्किल उठल्यावर नवीन गोष्ट राजकरणातून ऐकायलाच येते. याच परिस्थितीत अचानक एक धक्कायदायक घटना समोर आली. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. सर्वच अपसारमाध्यमांमध्ये एकच बातमी आणि एकच शंका उपस्थित केली जात होती की, खरंच अजितपवर भाजपसोबत जाणार आहे. या चर्चेवर अनेक बड्या नेत्यांनी आपले मत युद्ध सांगायला सुरवात केली होती. शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार भाजपसोबत सत्तेत बसले खरे. पण आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसदेखील सत्तेत शामिल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर वेगाने घडामोडी सुरु आहेत. कोणत्याही क्षणी अजित पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. मुंबईत सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक घेत आहेत. पण अजित पवार हे सत्तेत शामिल झाले तर एकनाथ शिंदे गटाचं वजन कमी होणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आणि या चर्चाना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आमदार संजय शिरसाट यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

संजय शिरसाट अजित पवार यांच्या भाजप सोबत येण्याबाबत म्हणेल की , जर अजित पवार भाजपसोबत शामिल झाले तर शिंदे गटावर काहीही परिणाम होणार नाही. तसेच आमच्या अस्तित्वाला कुठलाही धक्का पोहोचणार नाही. कुठलेही गालबोट लागणार नाही. उलट महायुती मजबूत होईल. आणि पुढे येणाऱ्या भविष्यात ज्या निवडणुका होणार आहेत तेव्हा त्या निवडणुकांवर याचा परिणाम होईल आणि जास्त जागा आपल्याच जिंकून येतील असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.त्याचबरोबर अजितदादांच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्यामध्ये जर तथ्य असेल तर ही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे. दादा हे येत असतील तर हिंदुत्वाचा विचार घेऊन त्यांनी यावे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील हे देखील तितका सत्य आहे, असंही शिरसाट यांनी म्हटलं.

हे ही वाचा : 

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकारनिर्मित आपत्ती, शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी, अजित पवार

Ajit Pawar PC Live, आम्ही सर्वजण राष्ट्रवादीतच राहणार

Breaking, अजित पवारांनी स्वतःच्या सोशल मीडियावर केले मोठे बदल, राष्ट्रवादीचा वॉलपेपर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss