संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची अचानक शासकीय वसतिगृहाला भेट दिली. आर्क परिसरात असणाऱ्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली. सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिगृहाला संजय शिरसाट यांनी भेट दिली. यावेळी संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे दिसले. लाज वाटत नाही का पैसे खायला ? हवे तर एक दिवस इथे राहून दाखवा, असं संजय शिरसाट म्हणाले. वसतिगृहाची मी पाहणी केली. जनावरं तरी राहतील का अशी स्थिती आहे. भिंती गाळतायेत, नळांना पाणी नाही. शासन करोडो रुपयांचा निधी देतंय, तरी अशी परिस्थिती आहे.
पुढे ते म्हणाले की, पाच लोकांचा स्टाफ आहे त्यातील तीन लोकं गैरहजर आहेत अशा पद्धतीने जर वसतीगृहाचा कारभार चालत असेल तर महाराष्ट्रात सगळीकडे अशीच अवस्था असेल. मी परवा समाजकल्याण आयुक्तांना भेटणार, त्यांना सांगणार की तु्म्ही सर्व जाऊन पहा. यांना जो भरघोस निधी दिला जातो तो जातो कुठे? या मुलांची अवस्था अशी का? या सगळ्याची उत्तरे आयुक्तांकडून घेणार आहे.
२८ तारीखला पुण्याला समाजकल्याण विभागातील जेवढे अधिकारी आहेत त्यांची बैठक घेणार. विद्यार्थी वसतीगृहात आले काय, राहिले काय यांना काही फरक पडत नाही. जेवणामध्ये अळ्या मिळत आहेत. विद्यार्थी घडवायला आलेत की बिघडवायला. याची चौकशी होऊन कारवाई होणार. वसतीगृहाच्या खोल्या पाहिल्या तर जनावर पण एकदिवस राहणार नाही. असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
हे ही वाचा:
Santosh Deshmukh हत्या प्रकरणी सुरेश धस यांचा मोठा खुलासा
CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग