Santosh Deshmukh Case : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगले तापले आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना धनंजय मुंडेच तातडीने राजीनामा घेण्यात आला. संतोष देशमुख यांना क्रूर मारहाण होत असताना दुसरीकडे आरोपींच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडीओ कॉल करण्यात आला. सतोष देशमुखांना मारहाण होत असताना ४ व्हिडीओ कॉल करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या ‘मोकारपंती’ ग्रुपवर व्हॉट्सॲप ग्रुप कॉल करण्यात आला. सध्या फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने संतोष देशमुखाला मारहाण झाल्यानंतर तीन वेळा व्हिडीओ कॉलवर चेहरा दाखवला असल्याची माहिती समोर आली आहे. सरपंचाचा चेहरा दाखवण्यात आला तेव्हा सरपंचाच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येत होते, असा जवाब ‘मोकारपंती’ ग्रुपमधील चार सदस्यांनी दिला आहे. देशमुख हत्या प्रकरणात हा जवाब अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप कॉलवर हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे. त्या दिवशी सुदर्शन भैय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता, असे म्हणत तीन वेळा मोबाईल तोंडाजवळ नेऊन चेहरा दाखवला. त्यावेळी सरपंचाच्या चेहऱ्यावरील जखमा मधून रक्त येत होते. व्हॉट्सॲप ग्रुपमधील एका सदस्याने कृष्णा आंधळेला सांगितले की, वाघ्या लई मारला आहे. आता बस करा सरपंचाला मारायचे, अशी सूचना देण्यात आली. कृष्णा आंधळे याने ‘मोकारपंती ग्रुप’ वर चार वेळा ग्रुप व्हिडिओ कॉल केला होता.असा जवाबात ४ सदस्यांनी म्हटले आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरारच आहे.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार
पालघरच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाच्या नेत्याची Sunil Tatkare यांच्यावर जहरी टीका