Friday, April 19, 2024

Latest Posts

तिहार जेलमध्ये असलेल्या सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली

तिहार जेल मधून मिळालेल्या माहितीनुसार तसेच तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तिहार जेल मध्ये असलेले सत्येंद्र जैन हे गुरुवारी बाथरूममध्ये कोसळले. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

तिहार जेल मधून मिळालेल्या माहितीनुसार तसेच तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तिहार जेल मध्ये असलेले सत्येंद्र जैन हे गुरुवारी बाथरूममध्ये कोसळले. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. जैन हे बाथरूममध्ये पडले होते. त्यानंतर डॉक्टरांनी जैन यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती खालावली होती. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जैन यांनी पाठ,पाय आणि खांदे सतत खांदे दुखणी चालू असल्याची तक्रार केली होती.

सत्येंद्र जैन ३१ मे २०२२ पासून कोठडीत आहेत. ६ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अपील केले. मात्र सर्वोच्च न्यायालयात उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. जैन यांच्या वकिलांनी त्यांना सुट्टीतील खंडपीठात सुनावणीसाठी सूट देण्यात यावी, असे सांगितले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना सुट्टीतील खंडपीठात जाण्याची परवानगी दिली होती. न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्रच्या याचिकेवर ईडीला नोटीस बजावून उत्तर मागितले.मात्र त्यावर अजूनही काही होऊ शकले नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर खटला हा चालूच आहे.

दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे गुरुवारी तिहार जेलमध्ये बाथरुममध्ये कोसळले आहेत. चक्कर आल्याने ते कोसळल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. तिथे त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्यांना दिल्लीतल्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे.मागच्या एका आठवड्यापासून जैन यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. यापूर्वीदेखील ते बाथरुममध्ये कोसळले होते. त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झालेली होती. आता पुन्हा तिहार जेलमधील बाथरुममध्ये कोसळल्याने जैन यांची प्रकृती खालावली आहे. तिहार प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांच्या सर्व चाचण्या केल्या जातील. त्यांना मणक्याचा त्रास होत आहे. त्यामुळे आवश्यकत्या चाचण्या केल्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, “सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

हे ही वाचा:

शरद पवार live : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले अरविंद केजरीवाल यांना समर्थन

कला शाखेतून १२ वी उत्तीर्णझाला आहात ? हे पर्याय निवडा आणि तुमचे करिअर बनवा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss