Thursday, April 25, 2024

Latest Posts

राजाराम साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची निवड

कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नूतन माजी आमदार अमल महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. नारायण चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये चांगलीच गाजली होती. या निवडणुकीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील या दोघांमध्ये चांगलीच लढत रंगली होती.

या निवडणुकीमध्ये महादेवराव महाडिक पॅनेलने सतेज पाटील यांच्या पॅनेलचा पराभव करत विजय मिळवला आहे. आज साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिल्या बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमधून नुतन अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली. माजी आमदार अमल महाडिक हे राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार होते. यावेळेला नवीन चेहऱ्याला संधी देणार का? याचीही चर्चा होत होती. निवडणुकीचा निर्णय अधिकारी निलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली.

कारखान्याची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपाच्या अत्यंत टोकदार प्रचाराने अवघ्या कोल्हापूर जिल्याचे लक्ष लागले होते. राजाराम कारखान्याच्या लढतीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली होती. सत्ता अबाधित राखताना महाडिक गटाने कारखान्याच्या सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवला. या कारखान्यावर मागील २८ वर्षांपासून सत्ता आहे. या निवडणुकीचा संयमाने प्रचार करतानाच धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आक्रमक प्रचार केला होता.

हे ही वाचा : 

Madhya Pradesh मध्ये मोठा अपघात, पुलावरून बस कोसळून १५ जणांचा मृत्यू

Madhya Pradesh मध्ये मोठा अपघात, पुलावरून बस कोसळून १५ जणांचा मृत्यू

KKRvsPBKS, पुन्हा एकदा चांगली खेळी खेळूनही शिखर धवनच्या संघाचा पराभव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss