spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

ST भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची काँग्रेस ज्येष्ठ नेते Vijay Wadettiwar यांची मागणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (Maharashtra State Road Transport Corporation) साधारणपणे १४ ते १८ टक्क्यांनी इतके भाडेवाडीचा प्रस्ताव दिला होता.

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. आता सगळीकडे ओला-उबरसारख्या कॅबची (Ola-Uber Cab) सेवा अस्तित्वात असल्यामुळे टॅक्सीने प्रवास करणे कमी झाले आहे. त्यात याआधी मुंबईमध्ये टॅक्सी युनियनच्या (Mumbai Taxi Mens Union) नेत्यांकडून यंत्रणांना टॅक्सीच्या भाड्यामध्ये चार रुपयांची वाढ करण्याची विनंती केली होती. ही  मागणी मान्य झाल्यामुळे आता एका किलोमीटरसाठी किमान 32 रुपये आकारण्यात येत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची (Mumbai Taxi Mens Union) मागणी मान्य झाल्यामुळे रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढून ते 26 रुपये इतके तर टॅक्सीचे भाडे 28 रुपयांवरून 32 रुपये इतके करण्यात आले आहे. याआधी ऑक्टोबर (October) 2022 मध्ये भाडेवाढीबद्दल निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता झालेल्या भाडेवाढीवरून राजकारण तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे.  भाडेवाढीवरून काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी केली आहे.

एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजेत. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? असा सवाल काँग्रेस ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांना दरवाढीचा विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खातं चालवते कोण? असा सवाल विचारत काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अधिकारी जर खाते चालवतात तर हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत-जंमत सुरू आहे. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. यासोबतच, अंगलट आलं की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगलं काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (Maharashtra State Road Transport Corporation) साधारणपणे १४ ते १८ टक्क्यांनी इतके भाडेवाडीचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव जर मान्य झाल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. एकीकडे वाढती महागाई तर दुसरीकडे ऑटोरिक्षा (Auto Rickshaw) आणि टॅक्सी युनियनकडून (Taxi Union) व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी भाडेवाढीची मागणी यामुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत असल्याने भाडेवाढीसंदर्भात विरोध दर्शवला जात आहे.

हे ही वाचा : 

मागील ५ वर्षात Best अपघातात किती नागरिक मृत्युमुखी? किती कर्मचारी निलंबित?

गृहमंत्री अमित शहांविषयीचे पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss