Friday, April 19, 2024

Latest Posts

शहाजी बापू नाना पटोलेंवर बरसले

सद्य स्थितीला राजकारणात चालेल्या नाट्यमय प्रयोगानंतर आता राजकीय वातावरणात एकमेकांवर ,आरोप प्रत्यारो जोरदार सुरु झाले आहेत. तर पक्ष पक्षामध्ये अनेक राजकीय नेते किती सरस आहेत याबद्दल चढाओढ सुरु झालेली आपल्याला दिसते.

सद्य स्थितीला राजकारणात चालेल्या नाट्यमय प्रयोगानंतर आता राजकीय वातावरणात एकमेकांवर ,आरोप प्रत्यारो जोरदार सुरु झाले आहेत. तर पक्ष पक्षामध्ये अनेक राजकीय नेते किती सरस आहेत याबद्दल चढाओढ सुरु झालेली आपल्याला दिसते. सांगोला येथे शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणा-या बाबूराव‌ गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव सत्काराचा कार्यक्रम ८ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलं असून पटोले हे राजकारणातील अतिशय कमी बुद्धी असणारे नेते असल्याची जहरी टीका देखील शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

शहाजी बापू पाटील म्हणाले की, सध्या अडचण अशी आहे की, आपल्या मानदेशी भाषेत एक म्हण आहे, ज्याला खालचं वरतं कळत नाही त्याला कारभारी केलं. नाना पटोलेला कोळज कुठे, करगडी कुठे, नारळा कुठे, अकलूज कुठे काही माहिती आहे का? उगं आपलं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्यायला कुणी माणूस नाही म्हणून याला केलं. हे काही नाही. राजकारणाची अतिशय कमी बुद्धी असलेले सध्या दुर्दैवाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत. नाना पटोले काय म्हणाले होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (स्व.) माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोला तालुका सर्वत्र ओळखला जात होता. सध्या मात्र वेगळ्या कारणांनी सांगोला तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. आम्ही मात्र झाडी, डोंगारवाले गद्दार नाही, तर राज्यातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी बांधील असणारे महाविकास आघाडीचे खुद्दार आहोत, असा टोला नाना पटोले यांनी नाव न घेता आमदार शहाजीबापू पाटील यांना लगावला होता.

हे ही वाचा : 

कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठी बांधवानी एकजुटीने मतदान करा, राज ठाकरेचे आवाहन

‘सामना’तून थेट पवारांवर निशाणा, गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss