spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक, तातडीने पदभार स्वीकारला

जालन्याच्या आंतरवाली गावात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमध्ये अनेक आंदोलक आणि पोलिसदेखील जखमी झालेले आहेत. सरकारने कारवाई करत पोलिस अधीक्षक तुषार दोशींना आज सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं.

जालन्याच्या आंतरवाली गावात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमध्ये अनेक आंदोलक आणि पोलिसदेखील जखमी झालेले आहेत. सरकारने कारवाई करत पोलिस अधीक्षक तुषार दोशींना आज सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. तुषार दोषींच्या जागेवर नवीन आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयपीएस शैलेश बलकवडे हे जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असतली. जालन्यातील मराठा आंदोलनामुळे राज्यभर वातावरण पेटलेलं आहे. त्यामुळे जालन्यात शांतता ठेवण्याचे प्रमुख आव्हान सरकारसमोर आहे. अशातच हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार लाठीचार्जच्या घटनेननंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पदांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे.

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने तातडीने पावलं उचलायला सुरूवात केली असून शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश बलकवडे यांनीही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी या आधी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शैलेश बलकवडे यांनीही तातडीने पदभार स्वीकारला आहे. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा आढावा आता नवीन एसपी शैलेश बलकवडे घेत असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा: 

जालन्याधुन जरांगे पाटील संतप्त झाले आणि म्हणाले…

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो मार्ग ७ए संदर्भात एक मोठी अपडेट समोर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss