Friday, December 1, 2023

Latest Posts

शरद पवार-अजित पवारांची भेट, भेटीनंतर अजितदादा दिल्लीला रवाना

ष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar Ajit Pawar meeting) यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली.

राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar Ajit Pawar meeting) यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार (Pratap Pawar) यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त भेट झाली. पुण्यातील बाणेरमध्ये (Baner Pune) प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील बहुतेक सर्वजण उपस्थित होते. प्रताप पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधील घरी शरद पवार गेले असताना, त्याठिकाणी अजित पवारदेखील याठिकाणी उपस्थित होते. शरद पवार हे त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त गेले होते. ही भेट संपूर्णपणे कौटुंबिक आहे, असं शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी एबीपी माझाला सांगितलं.

शरद पवार आणि अजित पवार यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे.

राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar Ajit Pawar meeting) यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार (Pratap Pawar) यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त भेट झाली. पुण्यातील बाणेरमध्ये (Baner Pune) प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील बहुतेक सर्वजण उपस्थित होते. प्रताप पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधील घरी शरद पवार गेले असताना, त्याठिकाणी अजित पवारदेखील याठिकाणी उपस्थित होते. शरद पवार हे त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त गेले होते. ही भेट संपूर्णपणे कौटुंबिक आहे, असं शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी एबीपी माझाला सांगितलं.

शरद पवार आणि अजित पवार यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. भेटीवेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss