Wednesday, June 7, 2023

Latest Posts

शरद पवार live : मोदी है तो मुमकिन है’ याला जनतेने नाकारलं आहे हे भाजपने समजून घेतले पाहिजे

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकने पुन्हा काँग्रेस ने बाजी मारली आणि भाजपचा पराभव झाला. सरकार जरी देशामध्ये भाजपचे असले तरी देखील देशामध्ये विविध कुकुड्या किंवा नवीन शकला लढवून महाराष्ट्रात बाजी मारली तरी देखील कर्मतकात यात्रा काँग्रेसचं हाती सत्ता निर्माण करणे भाजपाला शक्य झालेले नाही

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकने पुन्हा काँग्रेस ने बाजी मारली आणि भाजपचा पराभव झाला. सरकार जरी देशामध्ये भाजपचे असले तरी देखील देशामध्ये विविध कुकुड्या किंवा नवीन शकला लढवून महाराष्ट्रात बाजी मारली तरी देखील कर्मतकात यात्रा काँग्रेसचं हाती सत्ता निर्माण करणे भाजपाला शक्य झालेले नाही. तसेच निपाणीता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडच्या काळात भाजपने जिथे त्यांचं राजुला नाही त्याठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे.

शरद पवारांनी कर्नाटकमध्येही फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता व्यक्त केली आहे. “फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता नाकारता येत नाही. पण कर्नाटकच्या जनतेनंच असा निकाल दिलाय. फोडाफोडीला संधी मिळणार नाही याची खबरदारी जनतेनंच घेतली आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. गेल्या दिवसात घेतलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षाचा यश मिळाले. परंतु महाराष्ट्रात मध्ये जे एकनाथ शिंदे त्यांनी केले तेच करण्याचा प्रयत्न होता मात्र काँग्रेस पक्षाने या सगळ्याची खबरदारी घेऊन खोक्यांचे राजकारण चालणार नाही हे कर्नाटकातून दिसून आले. कर्नाटकात १३३ जागांवर काँग्रेस ने बाजी मारलेली आपल्याला दिसत आहे तर भाजपच्या दुप्पट पटीने काँग्रेसने भाजपवर मात केले आहे. त्यामुळे खोक्यांचे राजकारण कर्नाटकातील पसंतीस पडत नाहीये हे या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीचा सबशेल निषेध नक्की आहे हे दिसून येत आहे. आणि याचे सगळे श्रेय सत्तेच्या गैरवापर , लोक फोडून करणाऱ्या सत्ताधारण चांगलीच चपराक आहे.

मोदी है तो मुमकिन है’ याला लोकांनी नाकारल्याचं शरद पवार म्हणाले. “मोदी है तो मुमकिन है असं याआधीच बोलायला भाजपाच्या लोकांनी सुरुवात केली होती. हळूहळू एका व्यक्तीच्या हातात सगळी सूत्रं या गोष्टीला लोकांचा पाठिंबा नाही हे आता दिसायला लागतेल आहे त्यामुळे भाजपने याचा विचार करायला हवा असं शरद पवार म्हणाले. समितीला अपयश आलं ही गोष्ट मान्य करायलाच हवी. आम्ही समितीच्या विरोधात कुठेही उमेदवार उभा केला नाही. आम्ही कुठेही प्रचाराला गेलो नाही. कारण समितीला महाराष्ट्रानं विश्वास दिला होता. पण यावेळी एकीकरण समिती आणि अन्य पक्षांमध्ये एकवाक्यता राहिली नाही. याचा परिणाम म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती दिली. “महाराष्ट्रात आम्ही आमच्या पक्षाची बैठक दोन दिवसांनी बोलवली आहे. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र बसून पुढची आखणी आत्तापासूनच करावी हा माझा विचार आहे. त्यानुसार मी इतर दोघांशी बोलणार आहे. त्यानुसार या मार्गाने जायचा निर्णय आम्ही घेणार आहोत”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा:

भाजपा हा पराभव सहन करणार नाही,काहीतरी कुरखुड्या भाजप गोट्यातून सुरूच राहतील – पृथ्वीराज चव्हाण

Karnataka Assembly election 2023, ‘या’ पक्षांना मिळाली NOTA पेक्षाही कमी मतं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss