Saturday, June 3, 2023

Latest Posts

Sharad Pawar PC Live, विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचं, शरद पवार

आज एकीकडे सत्तासंघर्षाचा निकाल हा लागला आहे. तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुंबई दौऱ्यावर आहेत.

आज एकीकडे सत्तासंघर्षाचा निकाल हा लागला आहे. तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुंबई दौऱ्यावर आहेत. आज नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद हा साधला आहे.

पवार हे विरोधकांचा चेहरा झाला तर आनंदच आहे असं वक्तव्य नितीश कुमार यांनी आज केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र यावे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचं आहे असं शरद पवार म्हणाले आहेत. उद्धव यांच्या राजीनाम्याबाबत आता चर्चेला काहीच अर्थ नाही, असे प्रथम वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

संविधानाची ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली तशी आणखी लोकांना आली आहे. आम्ही वाट बघतोय अजून कधी आणि केव्हा येईल. सत्तेचा गैरवापर हा सातत्याने केला जातो आहे हे उत्तम उदाहरण असून आम्ही त्याविरोधात लढू असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला.

राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि जाहीरपणाने त्यावर ते इथे असताना बोललो आहे. संविधानात राज्यपाल हे एक इन्स्टिटयुशन आहेत. त्याची अप्रतिष्ठा कशी केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले. सुदैवाने ते आज इथे नाहीत त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही असे स्पष्ट सांगतानाच राज्यपालांची निवड करताना जी काळजी घ्यावी लागते ती काळजी न घेता जाणीवपूर्वक तिथल्या स्थानिक अन्य राष्ट्रीय विचारांचे लोकप्रतिनिधींना किंवा संस्थेला त्रास कसा होईल ही भूमिका घेऊन या नियुक्त्या केल्यानंतर हे घडत आहे. त्याचेच उदाहरण आपण महाराष्ट्रात पाहिले असा थेट हल्लाबोलही शरद पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

कोर्टाच्या निकालानंतर भाजपविरोधात प्रचार करणे सोपे होणार आहे असे सांगतानाच ज्यांच्या नावाने निवडून येता त्या पक्षाचा आदेश महत्वाचा असतो. काही निर्णय अजून व्हायचे आहेत. त्यामुळे नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे, असे वाटत नाही असा उपरोधिक टोलाही शरद पवार यांनी लगावला. माझा महाराष्ट्र दौरा सुरुच राहणार असून आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करू असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले… ; नाना पटोले

KBC 14 Birthday Special : केबीसीच्या मंचावर जया बच्चन नेमकं काय बोलल्या?, ज्यामुळे बिग बी रडले, पाहा व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss