Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीकडून आता सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली सुरु असल्याचे दिसत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच याबाबत मौन सोडले असून मोठे भाष्य केले आहे.
शरद पवार यांनी आज (रविवार, २४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “आमची जी अपेक्षा होती तसा निर्णय आला नाही. शेवटी हा लोकांनी दिलेला निर्णय आहे. माझयाकडे काही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे आतापर्यंतची जी व्यवस्था आहे त्यावर मी भाष्य करणार नाही. अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात आहे. असा निर्णय कधी आला नव्हता. आता आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं शोधणं , नाकी काय आहे ते समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहात लोकांमध्ये जाऊन उभं राहणं, मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील, मुद्दा तो नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मविआच्या पराभवामागील कारण नेमकं काय? असा प्रश्न विचारला असता शरद पवार पुढे म्हणाले, “जी माहिती आम्ही लोकांकडून, कार्यकर्त्यांकडून घेत आहोत. त्यानुसार, लाडक्या बहिणींचा मुद्दा ऐकायला मिळत आहे. हे एक महत्वाचं कारण आहे. प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली. दोन अडीच महिन्यांची रक्कम आताच देत आहोत, असाही प्रचार करण्यात आला. महिलांना सांगण्यात आले कि, आम्ही सत्तेत नसलो तर हि योजना बंद होईल. हि योजना बंद होईल अशी चिंता महिलांना झाली. त्यामुळे महिलांनी आमच्याविरोधात मतदान केलं असं प्राथमिकरीत्या दिसत आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”