Thursday, March 28, 2024

Latest Posts

शरद पवारांनी केली नवीन संसद भवनासंबंधी वाच्यता

गेल्या काही संसद भवनाच्या उद्घटनासंबंधी वाद निर्माण झाले होते. अनेकांनी नरेंद्र मोदी हे उदघाटन करणार म्ह्णून इतर विरोधी पक्षांनी आक्षेप दर्शवला होता. मात्र आता २८ मे रोजी देशाच्या राजधानी दिल्लीसह देशभरात आज नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

गेल्या काही संसद भवनाच्या उद्घटनासंबंधी वाद निर्माण झाले होते. अनेकांनी नरेंद्र मोदी हे उदघाटन करणार म्ह्णून इतर विरोधी पक्षांनी आक्षेप दर्शवला होता. मात्र आता २८ मे रोजी देशाच्या राजधानी दिल्लीसह देशभरात आज नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अनेक समर्थक नवीन संसद भावनेत उपस्थित होते. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनाही करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी नव्या संसद भवनाच्या उदघाटनासंबंधी त्यांना बोलावण्यात आले नाही. असे त्यांनी सांगितले. शरद पवारांनी नेहरूंच्या संकल्पनेच्या उलट घडामोडी संसद भवन उद्घाटन सोहळ्यात चालल्याची भूमिका मांडली. “आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रित करणं ही त्यांची जबाबदारी होती. कारण संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत, त्यांच्या भाषणाने होते. अधिवेशनाची सुरुवातही राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. संसदेचा कार्यक्रम याचा अर्थ लोकसभा आणि राज्यसभा आहे. लोकसभेचे अध्यक्ष दिसले याचा आनंद आहे. पण राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती आहेत. पण त्यांची उपस्थिती दिसली नाही. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम मर्यादित घटकांसाठीच होता का? असा प्रश्न आहे”, असं यावेळी शरद पवार म्हणाले.

तसेच शरद पवार यांनी महत्वाच्या मुद्द्याला हात घालून नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा, त्याचं नियोजन, आराखडा यासंदर्भात इतर पक्षातल्या नेत्यांशी चर्चा झाली नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. मात्र या संबंधी कोणीच चर्चा कारण पसंत केलं नाही. बहुतांशी या संबंधी चर्चा मसलत हि त्यांच्या गोटातल्या खास लोकांशीच केली असावी. त्यासंदर्भातल्या आराखड्याची चर्चाही कदाचित मर्यादित लोकांशी केली असेल. त्यात सगळ्यांना सहभागी करून घेतलं असतं, तर ते अधिक चांगलं दिसलं असतं”, असं शरद पवार म्हणाले. सभासदांना नेमकं काय निमंत्रण दिलंय हे मला माहिती नाही. कदाचित माझ्या दिल्लीच्या घरी निमंत्रण पाठवलं असेल तर ते मला माहिती नाही”, असंही शरद पवारांनी नमूद केलं.

हे ही वाचा:

नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, एक फोन…

New Parliament Building Inauguration, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदंडाला घातला दंडवत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss