Sharad Pawar : राजकारणातील किंगमेकर म्हणून ज्यांना ओळखलं जात ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याच्या राजकारणातील एक मोठा खुलासा केला आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उपस्तीथी दर्शविली असता पवार यांनी २६ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा गौप्यस्फोट केला. १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी केंद्र सरकार संसदेतील विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाले होते. अवघ्या एका मतानं वाजपेयी सरकारला राजीनामा द्यावा लागला होता. ते सरकार मी पाडल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला निलेशकुमार कुलकर्णी यांच्या ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये झाले. यावेळी बोलताना शरद पवारांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणी सांगताना १९९९ साली घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे. त्यावेळी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारवर लोकसभेत अविश्वासदर्शक ठराव दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते. त्याचबरोबर लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शरद पवार यावेळी म्हणाले की, ‘मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो, हे अनेकांना आठवणार नाही. आम्ही वाजपेयी सरकाच्या विरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर मोठी चर्चा झाली. अविश्वासदर्शक ठरावच्या मतदानापूर्वी आठ ते दहा मिनिटं ब्रेक होता. मी त्यावेळी संसदेच्या बाहेर ‘चर्चेसाठी’ गेलो. आम्ही परत आल्यानंतर मतदान झाले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या एका खासदारानं विरोधकांच्या बाजूनं मतदानं केलं. वाजपेयी सरकार फक्त एका मतानं पडले. आम्ही हे कसं केलं हे सांगणार नाही, असं म्हणत पवारांनी गुगली टाकली.
१७ एप्रिल १९९९ रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावर लोकसभेत मतदान झाले. त्या मतदानात वाजपेयी सरकारच्या बाजूनं २६९ तर विरोधात २७० मतं पडली होती. त्यामुळे अवघ्या एका मतानं वाजपेयी सरकार पडलं. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विरोधी पक्षाला सरकार जुळवण्यासाठी आवश्यक खासदारांची संख्या जुळवता आलेली नाही. त्यामुळे १९९९ साली पुन्हा एकदा लोकसभेेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना आजदेखील किंगमेकर म्हटले जाते.
Chhaava: अभिनेत्री Genelia Deshmukh कडून छावा चित्रपट फेम विकी कौशलचे तोंडभरून कौतुक
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.