spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Sharad Pawar: राज्यातून ६४ हजार मुली बेपत्ता, कस राज्य चालवता? शरद पवार यांची महायुतीवर टीका

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात आज (सोमवार, १८ नोव्हेंबर) संपणार असून आचारसंहिता लागू होणार आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच राष्टवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा आज कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासाठी प्रचारसभा पार पाडली. यावेळी त्यांनी महायुतीवर चौफेर टीका केली.

शरद पवार यावेळी उपस्थितांशी संवाद साधत म्हणाले, “लोकसभेला देशात वेगळं चित्र होतं. तुम्ही चांगली साथ दिली. भाजप बाबासाहेबांच्या घटनेत बदल करणारं. या देशाची घटना वाचवायची असेलं तर आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल पाहिजे हे आम्ही ठरवलं. आम्हाला महाराष्ट्रमध्ये आमूलाग्र बदल घडवायचा आहे. त्यांनी लाडकी बहीण काढली, कुणी सन्मान करत असेलं तर काही नाही.. पण त्यांनी सन्मान कसा केला. आज बहिणींना संरक्षण नाही, सन्मान नाही. महायुतीच्या सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अत्याचार किती वाढले? दर महिन्याला 67 हजार तक्रारी पोलीस स्टेशनंमध्ये येतात. 64 हजार मुली बेपत्ता होतात, कस राज्य चालवता? हे छत्रपती यांचं राज्य आहे. तुम्ही राज्यात कायं चालवताय?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, “बहिणींना सन्मान करण्याची धमक ह्यांच्यात नाही. फक्त ह्या मार्फत मतांचा जोगवा मागण्याच कामं सुरू आहे. आपल्याला ठोस पाऊल टाकायला लागतील,आणि ती पाऊल म्हणजे सत्तेमधील बदल… कारखाने कस चालवतो असं म्हणतात.. सत्ता हातात आली की पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सुळे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारा कर्तुत्ववान प्रतिनिधि मतदार संघात दिलेला आहे..हातांच्या पंजाला मतदान करा. काहीही करा एक व्हा आणि महाराष्ट्रमध्ये परिवर्तन करा. मला खात्री आहे. मतांचा विक्रम करून संग्राम थोपटें निवडून येतील. मताची खिचडी करू नका. मत योग्य ठिकाणी जाईल ह्याची काळजी घ्या,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss