spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Sharad Pawar आज जालन्यातील मराठा आंदोलकांची घेणार भेट

जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा समाज आंदोनाकर्ता बसले होते. तेव्हा पोलिसांनी मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीमार केला त्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे.

जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा समाज आंदोनाकर्ता बसले होते. तेव्हा पोलिसांनी मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीमार केला त्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. पोलिसांनी लाठी मार करायला सुरुवात केल्यानंतर आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेच्या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज जालना जिल्ह्यातील अंतवरली गावामध्ये जाणार आहेत. गावामध्ये जाऊन ते आंदोलकांना भेट देणार आहेत. त्यानंतर ते जखमी पोलिसांनाची भेट घेणार आहेत.

शरद पवार हे आज जालन्यातील अंतवरली सराटी गावामध्ये आंदोलकांना भेट देण्यासाठी जाणार आहेत. त्या आधी ११.३० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर १२.३० वाजता अंबड रुग्णलयातील जखमी पोलिसांची भेट घेतील. त्याची विचारपूस करतील. त्यांनतर शरद पवार हे सराटी गावामध्ये आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी भेट देणार आहेत. तर पुढे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (MLA Rajesh Tope) यांच्या कारखान्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत.

जालना जिह्यतील अंतवरली सराटी गावामध्ये २९ ऑगस्टपासून मराठा समाज आंदोलन करण्यासाठी बसले होते.या मोर्च्यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्याच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात बसलेल्या उपोषण कर्त्यांची स्थिती खालवण्याची शक्यता होती. हे आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना अटक केली. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानांतर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांनावर लाठी मार करण्यास सुरुवात केली.त्यानंतर आंदोलकांनी आक्रमक होऊन दगड फेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये ७ ते ८ पोलीस जखमी झाले आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये असा इशारा विरोशी पक्षांनी दिला आहे. तर गृहखात्याने घेतलेली ही भूमिका अतिरेकी असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. जालन्यातील या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss