औरंगजेबाची कबर ही मागील काही दिवसांपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी आलीये. औरंगजेबाची कंबर महाराष्ट्रात आहे. कबर काढून टाकावी अशी मागणी सर्वस्तरातून होताना दिसत आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची सगळ्यांची इच्छा आहे. मात्र, त्याला कायदेशीर अडचणी आहेत. काँग्रेसच्या काळातच पुरातत्त्व विभागामार्फत त्या कबरीला संरक्षण देण्यात आलं होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हंटल होत. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले निलेश लंके?
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारची वेळकाढूपणाची भूमिका सुरू आहे. तुम्ही राज्याचे नेतृत्व करता, तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकतात. अनेक ठिकाणी तर पोलीस बळाचा वापर करून चुकीच्या गोष्टी सरकार घडवून आणते, तर या गोष्टी करणं काही अशक्य गोष्ट नाही. पण, सरकारचा वेळकाढूपणा सुरु आहे. दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक आहे, असा म्हणत निलेश लंके यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय.
धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले निलेश लंके?
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्यातच याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सहआरोपी करावे अशी मागणी होत आहे. यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, सत्यता काय आहे ते पडताळून घ्यावे. केवळ आरोप करण्यात अर्थ नाही. मात्र, सत्यता पडताळून जर त्यात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
हे ही वाचा :
Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी
Follow Us