Saturday, April 20, 2024

Latest Posts

भाजप त्यांच्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांचे विधान

एकीकडे महाराष्ट्रात तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तारला मुहूर्त हा मिळाला. हा विस्तार झाल्या झाल्या दुसरीकडे भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडून मोठा धक्का दिला आहे.

मुंबई :- एकीकडे महाराष्ट्रात तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तारला मुहूर्त हा मिळाला. हा विस्तार झाल्या झाल्या दुसरीकडे भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडून मोठा धक्का दिला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात राजकीय घडामोडींना आणखी जास्त वेग आला आहे. हे सर्व सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो असे मोठे विधान शरद पवार यांनी केले आहे. शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत पवारांनी एकप्रकारे भाजपवर हल्लाबोल केला आहे.

२०२२ च्या बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने २४३ जागांपैकी ४५ जागा जिंकल्या. तर भाजपला ७७ जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवून राज्याची कमान त्यांच्याकडे सोपवली होती. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) दिल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘असे करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असे म्हणत आम्ही २०२० च्या विधानसभा निवडणुका एनडीएअंतर्गत एकत्र लढल्या होत्या. जनादेश जेडीयू आणि भाजपसोबत (BJP) होता. आम्ही जास्त जागा जिंकल्यानंतरही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. आज जे काही झाले ते बिहारच्या जनतेशी व भाजपशी विश्वासघात आहे, असे पत्रकार परिषदेत बिहार भाजपचे प्रमुख संजय जयस्वाल यांनी म्हटले आहे.

तर इकडे महाराष्ट्रात पवार म्हणाले की, वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेवरही भजपाने आघात केला. भजपा मित्रपक्षांना दगा देतं हीच नितीश कुमारांची देखील तक्रार होती. नितीश कुमार यांनी भाजपसोबत घेतलेल्या फारकतीवर पवारांनी वरील वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचचं असून शिंदे गटाचं नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा :-

Cabinet Meeting : राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

Latest Posts

Don't Miss