spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला; उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या नखांची सर नाही

सध्या सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत असून उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर मनसे अध्यक्ष आणि रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे याना गद्दार आणि बाळासाहेबांच्या शैली नक्कल करणारे म्हटले आहे. तसेच शिंदे गटांनी उद्धव ठाकरेंवर शिवसेना फोडल्याचा आरोप केला आहे, तर त्याच्यावर एफआयआर का दाखल होत नाही यावरही असा एक प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच १७० जागा महायुतीला मिळतील असा अतूट विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबरला संध्याकाळी प्रचाराचा तोफा थंडावल्या. पण मात्र यापूर्वी राज्यभरात प्रचाराचं धामधूम सुरु होती. या प्रचारादरम्यान अनेकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु होते.

माहीम मतदारसंघा मधून निवडणूक लढणारे मनसेचे अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या राज ठाकरे यांनी काल ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात आरोप केले. उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी गद्दार म्हटलं आहे. एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली असा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या या केलेल्या टीका नंतर अवघ्या काही वेळातच आणखी एका नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला करत टीका केली. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत. हातामध्ये रुद्राक्ष बधंताहेत, जणू मी काय बाळासाहेब ठाकरेच आहे. मात्र शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीका करत म्हणाले बाळासाहेबांची सर त्यांना येणार नाही. तसेच कदम यांनी घणाघात आरोप करत म्हटले की आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना फोडण्याचं पाप केलं असा आरोपही केला आहे.

उद्धव ठाकरेंवर रामदास कदम यांनी खेड रत्नागिरीरमध्ये बोलताना जोरदार टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या या प्रमुख नेत्यावर त्यांनी कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे यांचं या निवडणुकीमध्ये पितळ उघड पडेल. कदम यांनी टीका करत म्हंटले आहे की कालपर्यंत त्यांनी वाघाचं चामडं घातलंय असा अविभार्व होता ते आता उघड पडलंय. तसेच या निवडणुकीत महायुतीच्या (शिवसेना भाजप राष्ट्रवादी) किमान १७० जागा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा तोल एवढा खाली गेला आहे की ते मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना काहीही बोलतात. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक वक्तव्य केलं होतं की, मी जर असतो तर कानफाडीत मारली असती. जेवणावरून त्यांना उचलून आतमध्ये टाकलं होत, मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफ आय आर का दाखल होत नाही? रामदास कदम यांनी असा प्रश्न उपस्थित केला. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांची स्टाईल मारायचा प्रयत्न करत आहेत. ते हातामध्ये रुद्राक्ष बांधताहेत, जणू काय मी बाळासाहेब ठाकरे आहे. रामदास कदम यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला बोल करत म्हटले आहे की, बाळासाहेबांच्या नखाची सर सुद्धा तुला येणार नाही. स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडण्याचा पाप केलं आहे. मनोहर जोशींना उतारवयात स्टेजवरून भर जाहीर सभेत उतरवायला भाग पाडलं. त्यानी माझ्या बाबतीतही असाच प्लॅन केला होता मात्र मला एकनाथ शिंदेनी वाचवलं आहे. असं वक्त्यव्य रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटले आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss