Friday, December 1, 2023

Latest Posts

शिंदेंचं संपूर्ण भाषण भाजपला मजबूत करण्यासाठी होत, संजय राऊत

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मात्र अद्याप मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मात्र अद्याप मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जर आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे. तर ती मेहरबानी नाही. एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल. नाहीतर महाराष्ट्र पेटेल, असं संजय राऊत म्हणालेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलंय.

तसेच यावेळी माध्यमांशी बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, या देशांमध्ये गेल्या दहा वर्षापासून जातिवाद, धर्मवाद, क्षेत्र वाद याला खतपाणी घालून राजकारण करण्याच, निवडणुका लढवण्याचे काम कोण करतय? हे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करत आहे. हे स्वतः हमास आहे. त्यांच्या डोक्यात हमास आणि धमास भरलेल आहे. हे सर्व गोष्टी २०२४ मध्ये बोला तुम्ही सत्तेत नसणार.तुमच्या डोक्यात घानेरडे किडे भाजप ने टाकले आहेत. कालचे भाषण सर्व भाजप ला मजबूत करण्यावर होते. काल भाड्याचे लोक आले होते, भाजपने पाठवले होते असं देखील राऊत म्हणाले आहेत.

तसेच पुढे आरक्षण वर वोल्ट असताना राऊत म्हणाले आहेत की, आरक्षण द्यावे लागणार, नाहीतर जनता भडकेल. भारतीय जनता पक्षाच्या सहवासात आल्यापासून खोटी शपथ घेण्याचे काम हे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील भक्कम तडा देण्याचे काम करत आहे. काही दिवसांनी हे डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील. रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते. ते आता शिवसेनेत राहिले का नाही? जनता पक्ष आमच्यावरती छळ करते. त्यामुळे जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसणारे आहेत असं देखील राऊत म्हणाले आहेत.

तर पुढे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. शिमगा हा हिंदू सण नाही का? शिमगा हा महाराष्ट्रातील सण आहे. उत्सवाचा मोठा भाग आहे. तुम्हाला नको आहे का ? होळी, दिवाळी नवीन सण संघ परिवाराने आणले आहेत आणि ते तुम्ही महाराष्ट्रात सुरू करणार आहेत. शिमगा हा आमच्या धर्मात राजकारणात एक महत्त्व आहे आणि आम्हाला तुमच्या नावाने शिमगा करावाच लागतो. नक्कीच आम्हाला जळफळाट होत आहे. महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. महाराष्ट्राच्या छाताडावर बेकायदेशीर सरकार बसून या मराठ्यांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये आग पेटलेली आहे, जळफळाट होत आहे असं देखील राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

पुण्यातील कोयता गॅंगने हॉटेल चालकावर केला हल्ला

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss