नीती आयोगासारखा अयोग महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या धर्तीवर स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच मित्र असे स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे नाव आहे. ‘मित्र’ च्या उपाध्यक्षपदी अजय अशर या बिल्डरची नियुक्ती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना केली होती. मात्र आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा धक्का दिला आहे. मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून अजय अशर यांना हटवण्यात आले आहे.
बिल्डर अजय अशर हे ठाण्यातील बडे प्रस्थ असून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघ किसननगर येथे त्यांनी अनेक बांधल्या आहेत. अशर हे काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचे मित्र होते. मात्र 2000 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत सक्रिय झाले. शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदे सभागृह नेतेपदी पोहोचले, त्यावेळी अशर यांनी शिंदेंसोबत जवळीक साधली होती. शिंदे आमदार झाल्यानंतर ही जवळीक घट्ट मैत्रीमध्ये बदलली. त्यानंतर ठाण्यातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प असो वा रिडेव्हलपिंगचे प्रोजेक्ट असो अशर यांना प्राधान्य मिळण्यास सुरुवात झाली. तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांची नियुक्ती केली होती.
नेत्यांची नव्याने नियुक्ती
एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील काही निर्णय फडणवीस सरकारने बदलले आहेत. अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवण्यात आले आहे. तर दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्याचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. तसेच मुख्य सचिव यांसह इतर महत्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्यी करण्यात आली आहे. आता या निर्णयाने एकनाथ शिंदे यांना धक्काच बसलाय.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार