महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. मंगळवारी २६ नोव्हेंबरला महायुतीचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री शपथ घेणार असल्याचं बोलले जात आहे. शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे ५ मंत्री शपथ घेणार आहेत आणि राष्ट्रवादीचे सुद्धा ५ मंत्री शपथ घेणार आहेत. तर भाजपचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. दोन्ही पक्षाने संभाव्य आमदारांची नवे दिल्लीत पाठवले होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सावंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं समोर आले आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, आदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. पहिल्या टप्प्यात असे २० मंत्री शपथ घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठं पक्ष ठरला. भाजपच्या १३२ जागा, शिवसेनेच्या ५७ जागा तर राष्ट्रवादीच्या ४१ जागा निवडून आल्या आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचे जास्त मंत्री असतील. त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री असतील. मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही दाट शक्यता आहे.
राज्यात महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमताच्या जोरावर नवीन सरकारचा उद्या २६ नोव्हेंबरला शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यंमत्रीपदाच्या बाबतीत सर्वात प्रबळ दावेदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महायुतीने निवडणूक लढवली असली तरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व सूत्रे होती. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या रणनीतीने भाजप आणि महायुतीचे रेकॉर्ड ब्रेक असे उमेदवार निवडून आणले आहेत.
हे ही वाचा:
Bhaskar Jadhav: शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भास्कर जाधव यांचे मोठे वक्तव्य
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.