आज २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीत तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी येथे होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय स्थिती पाहता उद्धव ठाकरे गट परतीच्या दिशेने वाटचाल करतायेत असं दिसून येत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे २० आमदार निवडून आले. त्यानंतर शिवसैनिकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ओघ वाढला. असे असले तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी शुद्ध काही गोष्टी सोप्या नसतील. काही गोष्टींवरून ते दिसूही लागले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहिरात दिली आहे. त्यावरून धाराशिव जिल्ह्यात चर्चांना वेगळेच वळण आले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये धनुष्यबाण हे शिवसनेचे चिन्ह गायब झाले असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान आहे. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. त्यांच्या काही वक्तव्यावरून वादही निर्माण झाला होता. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपदासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही केले. पण यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
हे ही वाचा :
पुण्यात आढळले Guillain Barre Syndrome चे संशयित रुग्ण, काय आहेत लक्षणे? Pune
Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी