Saturday, April 20, 2024

Latest Posts

यावर्षी शिवसेनेचे दोन वर्धापन दिन होणार साजरे

१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन (Shivsena Anniversary) दिन म्हणून आपण साजरा करत आलो आहोत. मात्र यंदाच्या जरा चित्र वेगळे बघायला मिळणार आहे कारण एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत.

१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन (Shivsena Anniversary) दिन म्हणून आपण साजरा करत आलो आहोत. मात्र यंदाच्या जरा चित्र वेगळे बघायला मिळणार आहे कारण एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात यंदा मात्र शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. एक म्हणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वर्धापन दिन आणि दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचा वर्धापन दिन. शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन्ही गट आपापले वेगळे असे वर्धापन सोहळे करणार आहेत.

शिवसेनेचे आमदार आणि नेते यासाठी कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे, यंदाचा १९ जून हा वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याआधीच त्यांच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. शिवसेनेच्या इतिहासांत पहिल्यांदा असे दोन वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काडीमोड घेतला आणि शिवसेनेची सर्वच गणितं बदलून गेली. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा देखील केला जातो याच शिवसेनेचा येत्या १९जूनला वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची तयारी ठाकरे गटाकडून आधीच करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकानाथ शिंदे आणि त्यांचे आमदार देखील या वर्धापन दिनाच्या तयारीला लागले आहेत. गेल्या वर्षी दसरा मेळावादेखील दोन झाले होते उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा मेळावा हा बीकेसीवर पार पडला होता. ठाकरेंनी यंदाचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव साजरा करायचा असल्याचे आदेश याआधीच आपल्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत त्यामुळे आता दोन्ही बाजूने या वर्धापन दिनाच्या तयारी सुरु झाली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतर ठाकरे गटातील बैठकांचे सत्र सुरुच आहे. १८ जूनला मुंबईत राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रमुख म्हणून फेरनिवड होण्याची शक्यता आहे. कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे.

हे ही वाचा:

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

नसरुद्दीन शहा यांनी सरकारवर चढवला हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss