राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच श्रीरामपूर मतदारसंघातून (Shrirampur Vidhansabha Constituency) नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे (Bhusaheb Kamble) यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सभा रद्द झाल्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार लहू कानडे आणि शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे यांच्यात लढत होणार आहे. दोन दिवसांपूर्वी लहू कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सभा घेतली होती. आज (सोमवार, ११ नोव्हेंबर) भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हि सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. सभा रद्द करण्यात आल्याने भाऊसाहेब कांबळे यांना मात्र मोठे टेन्शन आल्याचे पाहायला मिळत आहे. रक्तदाब वाढल्यामुळे भाऊसाहेब कांबळेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. हि सभा रद्द करण्यात अली असली तरी दुसरीकडे लगतच्या नेवासा मतदारसंघात आज मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. श्रीरामपूर येथील सभा रद्द करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाहीत. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
भाऊसाहेब कांबळे यांनी यावरून माध्यमांशी संवाद साधत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव आहे. मला उमेदवारी देणारे हेच लोक आहेत. आणि आता मागे घ्यायला लावणारे हेच लोक आहेत,” असे म्हणत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. ते पुढे म्हणाले, “पक्षाने मला एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे मी धनुष्यबाणाचा उमेदवार आहे. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असते तर मी माघार घेतली असती. सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. मी निवडणूक लढवणारच आहे,” असे भाऊसाहेब कांबळे यांनी म्हंटले आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…